मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील पॉईंट टेबलचं गणित गेल्या काही दिवसांपासून किचकट झालं होतं. आता हा गुंता सुटत चालला आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यानंतर प्लेऑफच्या आणखी दोन जागा निश्चित झाल्या आहेत. गुजरात टायटन्सनंतर चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्सने प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केलं आहे. तर एका जागेसाठी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात चुरस आहे. आता रविवारी होणाऱ्या सामन्यानंतर एका जागेचं चित्र स्पष्ट होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सामना गुजरात टायटन्ससोबत आणि मुंबई इंडियन्सचा सामना सनराईजर्स हैदराबादशी होणार आहे.
गुणतालिकेत 18 गुणांसह गुजरात टायटन्सचा संघ अव्वल स्थानी आहे. तर 17 गुण आणि रनरेटच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने दुसरं स्थान पक्क केलं आहे. आता हे दोन संघ प्लेऑफमध्ये 23 मे 2023 रोजी भिडणार आहेत. तर लखनऊचा सामना मुंबई किंवा बंगळुरुशी होईल. मुंबई आणि बंगळुरुचे प्रत्येकी 14 गुण आहेत. त्यामुळे रनरेटच्या जोरावर प्लेऑफचं गणित सुटेल अशी शक्यता आहे.
संघ | मॅच | विजय | पराभव | गुण | एनआरआर |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | +0.820 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.652 |
लखनऊ सुपर जायंट्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.284 |
मुंबई इंडियन्स | 14 | 8 | 6 | 16 | -0.044 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 7 | 7 | 14 | +0.148 |
आरसीबी | 13 | 7 | 6 | 14 | -0.128 |
केकेआर | 14 | 6 | 8 | 12 | -0.229 |
पंजाब किंग्स | 14 | 6 | 8 | 12 | -0.304 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 5 | 9 | 10 | -0.808 |
सनरायजर्स हैदराबाद | 13 | 4 | 9 | 08 | -0.558 |
लखनऊ विरुद्ध कोलकाता सामना हा अतितटीचा झाला. कोलकात्याने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. लखनऊने 20 षटकात 8 गडी गमवून 176 धावा केल्या आणि विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं. कोलकात्याचा संघ 20 षटकात 7 गडी गमवून 175 धावा करू शकला. कोलकात्याचा अवघ्या एका धावेने पराभव झाला.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | कृणाल पंड्या (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मार्क्स स्टॉयनिस, निकोलस पूरन, प्रेरक मंकड, आयुष बदोनी, के गौथम, के शर्मा, रवि बिश्नोई, मोहसिन खान आणि नवीन-उल-हक.
कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कॅर्णधार), जेसन रॉय, रहमनुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, सुनील नरेन, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकूर, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.