मुंबई : आयपीएल 2023 मधील पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामधील सामन्यामध्ये दिल्लीकरांनी विजय मिळवला आहे. निसटत्या विजयासह दिल्लीने पंजाब संघाचं प्ले-ऑफमध्ये जाण्याचं स्वप्न धुळीला मिळवलं आहे. या विजयानंतर आता पॉइंट टेबलवर काय परिणाम झाला आहे? पंजाब संघाच्या पराभवाने नेमका कोणाचा फायदा झाला असावा?
संघ | मॅच | विजय | पराभव | गुण | एनआरआर |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | +0.820 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.652 |
लखनऊ सुपर जायंट्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.284 |
मुंबई इंडियन्स | 14 | 8 | 6 | 16 | -0.044 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 7 | 7 | 14 | +0.148 |
आरसीबी | 13 | 7 | 6 | 14 | -0.128 |
केकेआर | 14 | 6 | 8 | 12 | -0.229 |
पंजाब किंग्स | 14 | 6 | 8 | 12 | -0.304 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 5 | 9 | 10 | -0.808 |
सनरायजर्स हैदराबाद | 13 | 4 | 9 | 08 | -0.558 |
दिल्लीने पंजाबचा पराभव करत प्ले-ऑफच्या रेसमध्ये असलेल्या मुंबई, आरसीबी यांच्याबरोबरीचा आणखी एक संघ असलेल्या पंजाब संघाला बाहेर केलं आहे. आता पंजाबसाठी चमत्काराचीच आवश्यकता असून ते काही शक्य वाटत नाही. मात्र मुंबई आणि आरसीबी हे दोन्ही संघ दिल्लीच्या विजयाने आनंदी असणार आहेत. कारण आता पंजाबने शेवटच्या सामन्यात विजय मिळवला तरी त्यांचे 14 गुण होणार आहेत.
पहिल्या चार संघांमध्ये आता पाहिलं तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या लखनऊचे 15 तर चौथ्या क्रमांकावरील मुंबईचे 14 गुण आहेत. फक्त आरसीबीसाठी मोठी संधी आहे कारण आता त्यांचे दोन सामने बाकी असून त्यांनी जर दोन्ही जिंकले तर त्यांचे 16 गुण होतील. आरसीबीसाठी ही मोठी संधी असली तरी त्यांना दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.
मुंबई इंडिअन्स संघाला पण अशीच संधी आली होती. मात्र लखनऊविरूद्धच्या सामन्यात झालेल्या पराभवामुळे गणित आणखी किचकट होऊन बसलं आहे. तर दुसरीकडे राजस्थानचा विचार केला तर त्यांचाही एकच सामना राहिला असून त्यामध्ये विजय मिळवला तर 14 गुण होतील.
आयपीएल 2023 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सला 15 धावांनी पराभूत केलं. पंजाब किंग्सला हा विजय आवश्यक होता. मात्र दिल्लीने पंजाबचं स्वप्न धुळीस मिळवलं आहे. पंजाब किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं खरं पण रिली रोस्सोच्या आक्रमक खेळीमुळे पंजाबला मोठं आव्हान मिळालं. रोस्सोने 37 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी केली. दिल्लीने पंजाबसमोर 20 षटकात 2 गडी गमवून 213 धावांचं आव्हान दिलं. मात्र पंजाबचा संघ 8 गडी गमवून 198 धावा करू शकला. एकट्या लियम लिव्हिंगस्टोन याने 94 धावांची वादळी खेळी केली. मात्र समोरून त्याला कोणाची साथ न मिळाल्याने पंजाबला सामना गमवावा लागला.
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (कर्णधार), अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, कागिसो रबाडा, नॅथन एलिस, अर्शदीप सिंग
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), रिली रोसो, अक्षर पटेल, अमन हकीम खान, यश धुल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा, खलील अहमद