मुंबई : आयपीएलमधील 66 वा सामना पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामधील सामना राजस्थान संघाने 4 विकेट्सने जिंकला आहे. आजच्या सामन्यातील पराभवामुळे पंजाब यंदाच्या मोसमातून बाहेर पडणारा दिल्ली कॅपिटल्स, सनराइजर्स हैदराबाद यांच्यानंतर तिसरा संघ ठरला आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये गेलेल्या सामन्यात राजस्थान संघाच्या ध्रुव जुरेल याने राहुल चहरला सिक्स मारत सामना जिंकवला. आता पॉइंट टेबलमध्ये पाहा काय बदल झाला आहे.
संघ | मॅच | विजय | पराभव | गुण | एनआरआर |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | +0.820 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.652 |
लखनऊ सुपर जायंट्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.284 |
मुंबई इंडियन्स | 14 | 8 | 6 | 16 | -0.044 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 7 | 7 | 14 | +0.148 |
आरसीबी | 13 | 7 | 6 | 14 | -0.128 |
केकेआर | 14 | 6 | 8 | 12 | -0.229 |
पंजाब किंग्स | 14 | 6 | 8 | 12 | -0.304 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 5 | 9 | 10 | -0.808 |
सनरायजर्स हैदराबाद | 13 | 4 | 9 | 08 | -0.558 |
राजस्थान रॉयल्स संघाने पंजाब किंग्जवर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह राजस्थानने पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. मुंबई आता सहाव्या नंबरला फेकली गेली असून आता प्ले-ऑफचं गणित किचकट झालं आहे. राजस्थानने हा विजय 18.3 ओव्हरमध्ये मिळवला असता तर त्यांना पॉइंट टेबलमध्ये थेट चौथ्या स्थानी झेप घेता आली असती.
शनिवारी सीएसके आणि दिल्ली आणि संध्याकाळी कोलकाता आणि लखनऊ यांच्यामध्ये सामना होणार आहे. जर दोन्ही संघ जिंकले तर प्ले-ऑफमध्ये जागा मिळवणार आहेत. पण त्यांनी सामने गमावले तर मुंबई आणि आरसीबी संघा विजय मिळवत प्ले-ऑफमध्ये आपली जागा तयार करणार आहेत. जर सीएसके आणि लखनऊ विजयी झाले तर चौथ्या स्थानासाठी राजस्थान, मुंबई आणि आरसीबीमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.
आरसीबीचा रननेट जास्त असल्याने त्यांना जास्त संधी आहे. मात्र त्यासाठी शेवटच्या सामन्यात गुजरातचा पराभव करावा लागणार आहे. मुंबईने विजय मिळवला तरीसुद्धा त्यांचं गणित जर तरवर अवलंबून असणार आहे. शनिवारचे डबल हेडरचे सामने झाल्यावर प्ले-ऑफचा गुंता काही प्रमाणात सुटताना दिसेल.
आज पार पडलेल्या पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्समधील सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 188 धावांचं आव्हान दिलं होतं. यामध्ये सॅम करन 49 धावा, जितेश शर्मा 44 धावा आणि शाहरूख खान 41 धावा या तिघांच्या जोरावर पंजाबने हा स्कोर उभा केला होता.
पंजाबने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करतना राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल 50 धावा, देवदत्त पडिक्कल 51 धावा, हेटमायर 46 धावा यांनी महत्त्वाच्या खेळी करत संघाला विजय जवळ आणून दिला. शेवटला रियान पराग 20 धावा आणि ध्रुव जुरेलने सिक्सर मारत विजयावर शिक्कामोर्तब केलं.
पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | शिखर धवन (कॅप्टन) प्रभसिमरन सिंग, अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन | संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जॉस बटलर, देवदत्त पडिक्कल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, एडम झॅम्पा, ट्रेन्ट बोल्ट, केएम आसिफ आणि युझवेंद्र चहल