मुंबई : राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये सीएसके संघाचा 32 धावांनी पराभव झाला आहे. या पराभवाचा फटका सीएसकेला बसला असून त्यांना पॉइंट टेबलमधील पहिलं स्थान गमवावं लागलं आहे. तर राजस्थान संघ पहिल्या स्थानी पोहोचला आहे.
राजस्थान रॉयल्स संघाचे आजच्या विजयासह दहा गुण (+.939) झाले आहेत. दुसऱ्या स्थानी गुजरात टायटन्स संघसुद्धा दहा गुणांसह (+0.580) आहे, तर चेन्नई सुपर किंग्ज (+0.376) आता तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. मात्र चेन्नईचेसुद्दा दहा गुण आहेत. फक्त रनरेटच्या आधारावर राजस्थान रॉयल संघ पहिल्या स्थानी पोहोचला आहे.
संघ | मॅच | विजय | पराभव | गुण | एनआरआर |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | +0.820 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.652 |
लखनऊ सुपर जायंट्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.284 |
मुंबई इंडियन्स | 14 | 8 | 6 | 16 | -0.044 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 7 | 7 | 14 | +0.148 |
आरसीबी | 13 | 7 | 6 | 14 | -0.128 |
केकेआर | 14 | 6 | 8 | 12 | -0.229 |
पंजाब किंग्स | 14 | 6 | 8 | 12 | -0.304 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 5 | 9 | 10 | -0.808 |
सनरायजर्स हैदराबाद | 13 | 4 | 9 | 08 | -0.558 |
पॉइंट टेबल मध्ये जास्त काही उलाढाल झालेली नाही. फक्त राजस्थान रॉयल्स ने पहिलं स्थान पटकावलं आहे. तर चेन्नई सुपर किंग संघ तिसऱ्या स्थानी गेला आहे. तर उर्वरित सर्व संघ आहे त्या जागेवर आहेत. लखनऊ 8 गुणांसह चौथ्या, आरसीबी 8 गुणांसह पाचव्या, पंजाब किंग्स 8 गुणांसह सहाव्या, कोलकाता 6 गुणांसह सातव्या, मुंबई 6 गुणांसह आठव्या, हैदराबाद 4 गुणांसह नवव्या आणि दिल्ली 4 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.
आयपीएल-2023 मध्ये राजस्थान रॉयल्सने चेन्नईचा दुसऱ्यांदा पराभव केला आहे. यावेळी त्यांच्या घरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळताना राजस्थानने चेन्नईचा 32 धावांनी पराभव केला. यापूर्वी हे दोन्ही संघ चेपॉकमध्ये भिडले होते आणि त्या सामन्यातही चेन्नईचा पराभव झाला होता. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने पाच गडी गमावून 202 धावा केल्या. चेन्नईला सहा गडी गमावत 170 धावाच करता आल्या. राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक 77 धावा केल्या. चेन्नईकडून शिवम दुबे याने सर्वाधिक 52 धावा केल्या.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेवन): यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सैमसन (w/c), शिमरोन हेटमेयर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, एडम ज़म्पा, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल
चेन्नई सुपर किंग्स (प्लेइंग इलेवन): ऋुतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोइन अली, अंबाती रायडू, शिवम दूबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कप्तान), मथीशा पथिराना, तुषार देशपांडे, महेश तीक्ष्णा