मुंबई : आयपीएलच्या लीगमधील शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यातील झालेल्या सामन्यात गुजरातने 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयामुळे पॉइंट टेबलमध्ये प्ले-ऑफसाठीच्या अंतिम चार संघांमध्ये मुंबई इंडिअन्स संघाचा समावेश झालेला आहे. यंदाच्या पर्वामध्ये शेवटच्या सामन्यापर्यंत रोमांच पाहायला मिळाला. आजच्या डबल हेडरच्या सामन्यानंतर चार संघ कोणते ते समोर आलं आहे.
संघ | मॅच | विजय | पराभव | गुण | एनआरआर |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | +0.820 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.652 |
लखनऊ सुपर जायंट्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.284 |
मुंबई इंडियन्स | 14 | 8 | 6 | 16 | -0.044 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 7 | 7 | 14 | +0.148 |
आरसीबी | 13 | 7 | 6 | 14 | -0.128 |
केकेआर | 14 | 6 | 8 | 12 | -0.229 |
पंजाब किंग्स | 14 | 6 | 8 | 12 | -0.304 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 5 | 9 | 10 | -0.808 |
सनरायजर्स हैदराबाद | 13 | 4 | 9 | 08 | -0.558 |
पॉइंट टेबलमध्ये जे टॉपचे चार संघ आहेत ते फिक्स झाले आहेत. गुजरात यंदाचा पहिला संघ ज्यांचे 20 गुण झाले आहेत. तर दुसऱ्या स्थानी चेन्नई सुपर किंग्ज 17 गुणांसह, तिसऱ्या स्थानी लखनऊ सुपर किंग्ज तिसऱ्या स्थानी तर आता 16 गुणांसह मुंबई चौथ्या स्थानी आहे.
गुजरात संघाच्या विजयामुळे मुंबईसाठी प्ले-ऑफची दारे खुली झाली आहे. आता प्ले-ऑफमधील चार संघही समोर आले आहेत. यामध्ये गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर किंग्ज आणि मुंबई इंडिअन्स हे अंतिम चार संघ दाखल झाले आहेत. आता गुजरात आणि चेन्नई यांच्यामधील जिंकणारा संघ फायनलमध्ये धडक मारणार आहे. गुजरात किंवा चेन्नई यांच्यमधील ज्या संघाचा पराभव होईल त्यांचा सामना लखनऊ आणि मुंबई यांच्यातील विजयी संघासोबत असणार आहे.
IPL 2023 चा शेवटचा म्हणजेच 70 वा लीग सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला, ज्यामध्ये गुजरातने 6 विकेट्सने विजय मिळवला. हा सामना हरल्याने आरसीबीचे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्नही भंगले. या पराभवानंतर आरसीबीचा विराट कोहली चांगलाच संतापलेला दिसला. त्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 198 धावांचा पाठलाग करताना गुजरातचा फलंदाज शुभमन गिलने नाबाद खेळी खेळली.
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 5 गडी गमावून 197 धावा केल्या. संघासाठी, विराट कोहलीने 61 चेंडूत 13 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 101 धावांचे शतक झळकावले. मात्र, शुभमन गिलच्या शतकाने कोहलीच्या नाबाद शतकाची छाया पडली. धावांचा पाठलाग करताना गुजरातचा सलामीवीर शुभमन गिलने 52 चेंडूत 5 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने नाबाद 104 धावा करून सामना जिंकला.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल, ऋद्धिमान साहा (W), हार्दिक पांड्या (C), दासून शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी, यश दयाल
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), मायकेल ब्रेसवेल, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अनुज रावत, दिनेश कार्तिक (W), हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज, विजयकुमार वैशाख