आयपीएल 2024 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा 7 विकेट राखून धुव्वा उडवला. यासह कोलकाता नाईट रायडर्स गुणतालिकेतील आपलं दुसरं स्थान अबाधित ठेवलं आहे. तर दिल्ली कॅपिटल्सला रॅकिंगमध्ये काही फरक पडला नाही मात्र पराभवामुळे प्लेऑफचं गणित किचकट झालं आहे. कोलकाता नाईट रायडर्सचे एकूण 12 झाले असून आणखी दोन सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफमधील स्थान पक्कं होईल. कोलकात्यला अजूनही पाच सामने खेळायचे आहेत. त्यापैकी दोन सामने मुंबई इंडियन्ससोबत आहेत. दिल्ली कॅपिटल्सचे एकूण 10 गुण आहेत आणि अजून 3 सामने शिल्लक आहे. त्यामुळे पुढच्या तिन्ही सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागेल अन्यथा प्लेऑफमधून पत्ता कट होऊ शकतो. कारण 16 गुण करण्यासाठी तीन विजय गरजेचे आहेत.
राजस्थान रॉयल्स 16 गुण आणि 0.694 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. कोलकाता नाईट रायडर्स 12 गुण आणि +1.096
नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानी, चेन्नई सुपर किंग्स 10 गुण आणि 0.810 नेट रनरेटसह तिसऱ्या, सनरायझर्स हैदराबाद 10 गुण आणि 0.075 नेट रनरेटसह चौथ्या, लखनौ सुपर जायंट्स 10 गुण आणि 0.059 नेट रनरेटसह पाचव्या, दिल्ली कॅपिटल्स 10 आणि -0.442 नेट रनरेटसह सहाव्या, गुजरात टायटन्स 8 गुण आणि -1.113 नेट रनरेटसह सातव्या, पंजाब किंग्स 6 गुण आणि -0.187 नेट रनरेटसह आठव्या, मुंबई इंडियन्स 6 गुण आणि -0.261 नेट रनरेटसह नवव्या, रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरु 6 गुण आणि -0.415 नेट रनरेटसह दहाव्या स्थानावर आहे.
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय पुरता फसल्याचं दिसून आलं. दिल्ली कॅपिटल्सचा एकही फलंदाजी मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. कुलदीप यादवने 26 चेंडूत ठोकलेल्या नाबाद 35 धावा ही सर्वोत्तम खेळी ठरली. या व्यतिरिक्त एकही खेळाडू 30 च्या पार धावसंख्या करू शकला नाही. ऋषभ पंतही 27 धावा करून तंबूत परतला. कोलकात्याकडून वरुण चक्रवर्तीने 2, वैभव अरोराने 2, हर्षित राणाने 2, मिचेल स्टार्कने 1 आणि सुनील नरीनने एक गडी बाद केला.
कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रसिक दार सलाम, लिझाद विल्यम्स, खलील अहमद.