IPL 2024 Points Table: गुजरात टायटन्सच्या पराभवाने गुणतालिकेत उलथापालथ, पंजाबला झाला फायदा

| Updated on: Apr 04, 2024 | 11:31 PM

आयपीएल स्पर्धेतील 17 वा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात पार पडला. या सामन्यात शुबमन गिल आणि शशांक गिल यांच्या खेळीने लक्ष वेधून घेतलं. गिलने संघाच्या धावसंख्येत भर घालण्यासाठी, तर शशांकने विजयासाठी नाबाद 61 धावांची भर घातली. पण अखेर पंजाब किंग्सने 3 गडी राकून विजय मिळवून दिला.

IPL 2024 Points Table:  गुजरात टायटन्सच्या पराभवाने गुणतालिकेत उलथापालथ, पंजाबला झाला फायदा
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेतील 17 सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात पार पडला. पंजाब किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच गुजरात टायटन्सला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. गुजरातने 20 षटकात 4 गडी गमवून 199 धावा केल्या आणि विजयासाठी 200 धावांचं आव्हान दिलं. पंजाब किंग्सची या धावांचा पाठलाग करताना सुरुवात एकदम खराब झाली. पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन स्वस्तात बाद झाला. त्यानंतर जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग , सॅम करन आणि सिकंदर राजा टप्प्याटप्प्याने बाद झाले. त्यानंतर शशांक सिंगने डाव सावरला. शशांक सिंगने 29 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकरांच्या मदतीने नाबाद 61 धावा केल्या. जितेश शर्माने दोन षटकार मारून सामन्यात रंगत आणली होती. तर आशुतोष शर्माने 17 चेंडूत 31 धावा करत इम्पॅक्ट टाकला. तसेच संघाला विजयाच्या वेशीवर आणून सोडलं. अखेर पंजाब किंग्सने 3 गडी राखून गुजरात टायटन्सवर विजय मिळवला.

गुणतालिकेत कोलकाता नाईट रायडर्स तीन पैकी तीन सामने जिंकत अव्वल स्थानी आहेत. कोलकात्याच्या खात्यात 6 गुण असून नेट रनरेट 2.518 इतका आहे. राजस्थान रॉयल्सनेही 3 पैकी 3 सामने जिंकत 6 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. राजस्थान रॉयल्सचे 1.249 नेट रनरेट आहे. चेन्नई सुपर किंग्स तिसऱ्या स्थानी आहे. 4 गुण आणि 0.976 इतका नेट रनरेट आहे. लखनौ सुपर जायंट्सचा संघ चौथ्या स्थानी आहे. 4 गुण आणि 0.483 नेट रनरेट आहे. पाचव्या स्थानावर पंजाब किंग्सने झेप घेतली आहे. गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबादला फटका बसला आहे. पंजाब किंग्स 4 गुण आणि -0.220 सह पाचव्या स्थानी आहे.

गुजरात टायटन्स संघ 4 गुण आणि -0.580 नेट रनरेटसह सहाव्या स्थानी आहे.सनरायझर्स हैदराबादचा संघ 2 गुण आणि 0.204 नेट रनरेटसह सातव्या स्थानी, आरसीबी संघ 2 गुण आणि -0.876 नेट रनरेटसह आठव्या स्थानी, दिल्ली कॅपिटल्स 2 गुण आणि -1.347 नेट रनरेटसह नवव्या आणि मुंबईच्या खात्यात अजून एकही गुण नाही. त्यामुळे शेवटच्या स्थानी आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जितेश शर्मा (विकेटकीपर), प्रभसिमरन सिंग, सॅम कुरान, शशांक सिंग, सिकंदर रझा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा, शुबमन गिल (कर्णधार), साई सुधारसन, केन विल्यमसन, विजय शंकर, अजमतुल्ला उमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, दर्शन नळकांडे