आयपीएल 2024 स्पर्धेतील 48 वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला. या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात मुंबई इंडियन्सला अपयश आलं. नाणेफेकीचा कौल जिंकत लखनौ सुपर जायंट्सने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मुंबई इंडियन्स संघाची सुरुवात निराशाजनक झाली. पॉवर प्लेमध्ये चार गडी गमवल्याने मुंबईचा संघ बॅकफूटवर गेला. मुंबई इंडियन्सने 20 षटकात 7 गडी गमवून 144 धावा केल्या आणि विजयासाठी 145 धावा दिल्या. या धावा लखनौ सुपर जायंट्सने 19.2 षटकात पूर्ण केल्या. या विजयासह लखनौ सुपर जायंट्सने पुन्हा एकदा टॉप 4 मध्ये एन्ट्री मारली आहे. तर मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत सर्वात तळाशी आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये खेळण्याचं स्वप्न जवळपास भंगलं आहे. मुंबई इंडियन्सचा या स्पर्धेतील हा सातवा पराभव आहे. आतापर्यंत फक्त 3 सामन्यातच विजय मिळवला आहे. त्यामुळे उर्वरित चार सामन्यात विजय मिळवला तर 14 गुण होतील. त्यामुळे मुंबईचं पुढचं सर्व गणित आता जर तर वर अवलंबून असणार आहे. त्यात नेट रनरेटही चांगला असणं गरजेचं आहे.
राजस्थान रॉयल्स संघ 16 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स 12 गुण आणि +1.096 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. लखनौ सुपर जायंट्सने मुंबईला पराभूत करत तिसरं स्थान गाठलं आहे. तर चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबादची चौथ्याआणि पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. चेन्नई सुपर किंग्स 10 आणि 0.810 नेट रनरेटसह चौथ्या, सनरायझर्स हैदराबाद 10 0.075 पाचव्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स 10 गुण आणि -0.442 नेट रनरेटसह सहाव्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्स 8 गुण आणि -1.113 नेट रनरेटसह सातव्या, पंजाब किंग्स 6 गुण आणि -0.187 नेट रनरेटसह आठव्या, मुंबई इंडिन्स 6 गुण आणि -0.272 नेट रनरेटसह नवव्या आणि आरसीबी 6 गुण आणि -0.415 नेट रनरेटसह दहाव्या स्थानी आहे.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नेहल वढेरा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, ॲश्टन टर्नर, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान, मयंक यादव.