आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 23 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने पंजाब किंग्सवर 2 धावांनी थरारक विजय मिळवला. पंजाबने विजयासाठी मिळालेल्या 183 धावांचा पाठलाग करताना जोरदार झुंज दिली. पंजाब जवळपास विजयापर्यंत पोहचलीच होती, मात्र 2 धावांनी प्रयत्न अपूर्ण पडले. पंजाबला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 180 धावाच करता आल्या. त्याआधी हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 182 धावा केल्या होत्या.
पंजाबकडून आशुतोष शर्मा याने 15 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 3 फोरसह नाबाद 33 धावा केल्या. तर शशांक सिंह याने 25 बॉलमध्ये नॉट आऊट 46 रन्स केल्या. या जोडीने केलेल्या फटकेबाजीमुळे सामना शेवटच्या बॉलपर्यंत गेला. मात्र हैदराबाद विजय मिळवण्यात यशस्वी ठरली. हैदराबादचा निसटता विजय झाला. या 17 व्या हंगामातील 23 व्या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे आहे? हे जाणून घेऊयात.
या 23 व्या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोणताही बदल झालेला नाही. सामन्याआधी हैदराबाद आणि पंजाब अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानी होते. सामन्यानंतरही दोन्ही संघ त्याच स्थानी आहेत. मात्र हैदराबादच्या विजयानंतर आणि पंजाबच्या पराभवानंतर दोघांच्या नेट रनरेटमध्ये बदल झाला आहे. हैदराबादच्या नेट रनरेटमध्ये सुधार झाला आहे. हैदराबादचा नेट रनरेट सामन्याआधी 0.409 होता तो विजयानंतर 0.344 असा आहे. तर पंजाबचा नेट रनरेट -0.220 असा होता तो पराभवानंतर 0.196 इतका आहे. टॉप 4 मध्ये अनुक्रमे राजस्थान, कोलकाता, लखनऊ आणि चेन्नई आहेत. तर गुजरात, मुंबई, बंगळुरु आणि दिल्ली अनुक्रमे सातव्या ते दहाव्या स्थानी कायम आहेत. दरम्यान 10 एप्रिल रोजी स्पर्धेतील 24 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स असा सामना होणार आहे.
पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, सिकंदर रझा, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट आणि टी नटराजन.