IPL 2024 Points Table: चेन्नईचा धुव्वा उडवत आरसीबी क्वालिफाय, प्लेऑफचे 4 संघ निश्चित

| Updated on: May 19, 2024 | 1:23 AM

IPL 2024 Points Table 68th Match: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. आरसीबी प्लेऑफमध्ये पोहचणारी चौथी टीम ठरली आहे. तर चेन्नईचं पॅकअप झालं आहे.

IPL 2024 Points Table: चेन्नईचा धुव्वा उडवत आरसीबी क्वालिफाय, प्लेऑफचे 4 संघ निश्चित
virat kohli and mohammed siraj rcb
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएलच्या 17 व्या हंगामातील 68 व्या सामन्यात इतिहास रचला आहे. आरसीबीने चेन्नई सुपर किंग्सवर मात करत 22 मार्चच्या पराभवाचा वचपा घेतला. आरसीबीचा हा सलग सहावा विजय ठरला. आरसीबीने या विजयासह 14 गुणांसह प्लेऑफमध्ये धडक दिली आहे. आरसीबीने चेन्नईसमोर विजयासाठी 219 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी हा सामना 18 धावांच्या फरकाने जिंकायचा होता. मात्र आरसीबीच्या गोलंदाजांसमोर चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 191 धावांपर्यंतच पोहचता आलं.आरसीबी या विजयासह प्लेऑफसाठी पात्र ठरली. तर चेन्नईचं पॅकअप झालं आहे. तसेच आरसीबीच्या या विजयासह प्लेऑफमध्ये पोहचणारे चारही संघ निश्चित झाले आहेत. आता पहिल्या 2 स्थांनासाठी चुरस असणार आहे.

प्लेऑफसाठी कोलकाता नाईट रायडर्सने सर्वात आधी क्वालिफाय केलं. त्यानंतर राजस्थान रॉयल्सने धडक मारली. सनरायजर्स हैदराबाद प्लेऑफमध्ये पोहचणारी तिसरी टीम ठरली. तर आता निर्णायक सामन्यात चेन्नईचा धुव्वा उडवत आरसीबीने प्लेऑफमध्ये प्रवेश केला. त्यामुळे 4 संघ निश्चित झाले. मात्र टॉप 2चा गुत्ता अजूनही कायम आहे. 4 संघ निश्चित होऊनही क्वालिफायर 1 साठी पहिले 2 संघ कोण हे अजून निश्चित होऊ शकलेलं नाही.

रविवारी 19 मे रोजी आयपीएलच्या 17 व्या हंगामातील डबल हेडर पार पडणार आहे.या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात हैदराहबाद विरुद्ध पंजाब आमनेसामने असणार आहेत. तर हंगामातील अखेरच्या साखळी सामन्यात राजस्थान विरुद्ध केकेआर भिडतील. या सामन्याच्या निकालानंतरच टॉप 2 चे संघ निश्चित होतील.

आरसीबी विजयी षटकारासह प्लेऑफमध्ये

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन आणि मोहम्मद सिराज.

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दूल ठाकुर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग आणि महेश तीक्षना.