आयपीएल 2024 स्पर्धेत प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत उलथापालथ होताना दिसत आहे. रविवारी पार पडलेल्या डबल हेडर सामन्यात असंच चित्र पाहायला मिळालं. राजस्थान रॉयल्स विरुद्धचा सामना चेन्नई सुपर किंग्सने जिंकला आणि गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सचं स्थान जरी निश्चित असलं तरी काहीही होऊ शकतं अशी स्थिती आहे. कारण 16 गुणांच्या शर्यतीत काही संघ आहेत. त्यामुळे उर्वरित दोन सामन्यापैकी एक सामना राजस्थानला काहीही करून जिंकावाच लागणार आहे. राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्ससमोर विजयासाठी 142 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान चेन्नई सुपर किंग्सने 18.2 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं. राजस्थान रॉयल्स संघ 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र प्लेऑफमधील स्थान अजूनही निश्चित नाही. त्यामुळे पुढच्या काही सामन्यात काय चित्र असेल याची उत्सुकता आहे. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स हे दोन संघ अधिकृतरित्या स्पर्धेबाहेर पडले आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना पार पडला. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने जिंकला. आरसीबीने दिल्लीला 47 धावांनी पराभूत केलं. यासह आरसीबीचे 12 गुण झाले असून +0.387 नेट रनरेट इतका झाला आहे. तसेच गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप घेतली आहे, अजूनही आरसीबीच्या प्लेऑफच्या आशा कायम आहेत. आता तर ही लढत आणखी चुरशीची झाली आहे. आरसीबीचा शेवटचा सामना तिसऱ्या क्रमांकावर 14 गुणांसह असलेल्या चेन्नई सुपर किंग्सशी आहे. या सामन्यात आरसीबीने चेन्नईला चांगल्या नेट रनरेटसह पराभूत केलं तर टॉप चारमध्ये स्थान मिळू शकतं.आरसीबीला टॉप चारमध्ये जागा मिळवण्यासाठी आता फक्त एक विजय आणि नेट रेनरेट हे समीकरण सांभाळावं लागणार आहे. दुसरीकडे, हैदराबाद दोन्ही सामन्यात पराभूत व्हावं. तर गुजरात, दिल्ली, लखनौ उर्वरित सामन्यात पराभूत होणं गरजेचं आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): जेक फ्रेझर-मॅकगुर्क, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), शाई होप, कुमार कुशाग्रा, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), कुलदीप यादव, रसिक दार सलाम, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.