आयपीएल 2024 स्पर्धेतील 65 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्स संघाला 5 गडी राखून मात दिली. राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 9 गडी 144 धावा केल्या होत्या आणि विजयासाठी 145 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान पंजाब किंग्सने 5 गडी गमवून 18.5 षटकात पूर्ण केलं. मात्र तसा या सामन्यामुळे गुणतालिकेवर काही फरक पडला नाही. राजस्थान रॉयल्सने यापूर्वीच प्लेऑफमधले स्थान निश्चित केलं आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्सचं प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे हा सामना केवळ औपचारिक होता असंच म्हणावं लागेल. या सामन्याचा प्लेऑफच्या शर्यतीत असलेल्या संघांवर काहीही परिणाम झालेला नाही. प्लेऑफच्या उर्वरित दोन जागांसाठी चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात चुरस आहे. त्यामुळे या तीन संघांपैकी कोणते दोन संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्स 19 गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर राजस्थान रॉयल्स 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सचा शेवटचा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आहे. या सामन्याकडे प्लेऑफच्या दृष्टीने पाहिलं जात आहे. चेन्नई सुपर किंग्स 14 गुण आणि +0.528 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानी आहे. सनरायझर्स हैदराबाद 14 गुण आणि +0.406 नेट रनरेटसह चौथ्या स्थानी आहे. हैदराबादचे अजून दोन सामने शिल्लक आहेत. दिल्ली कॅपिटल्सचं 14 सामने झाले असून 14 गुण आणि -0.377 नेट रनरेटसह पाचव्या स्थानी आहे. पण प्लेऑफची शक्यता जवळपास अशक्य आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 12 गुण आणि +0.387 नेट रनरेटसह सहाव्या स्थानी आहे. आरसीबीला प्लेऑफची संधी आहे. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी केली तर टॉप 4 मध्ये संधी मिळू शकते.
लखनौ सुपर जायंट्सचा एक सामना शिल्लक आहे. त्यात जिंकलं तर 14 गुण होतील. मात्र नेट रनरेट -0.787 इतका आहे. त्यामुळे टॉप 4 मध्ये संधी मिळणं खूपच कठीण आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): प्रभसिमरन सिंग, जॉनी बेअरस्टो, रिली रोसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन (कर्णधार), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, नॅथन एलिस, राहुल चहर, अर्शदीप सिंग.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान, युझवेंद्र चहल.