IPL 2024 Points Table: हैदराबादला पॉइंट्स टेबलमध्ये मोठा फायदा, दोघांना फटका

| Updated on: Apr 06, 2024 | 12:09 AM

IPL 2024 Points Table 18th Match : सनरायजर्स हैदराबादने चेन्नईला पराभूत करुन सलग दुसरा विजय मिळवला आहे. या 18 व्या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण?

IPL 2024 Points Table: हैदराबादला पॉइंट्स टेबलमध्ये मोठा फायदा, दोघांना फटका
srh won against csk ipl 2024,
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

सनरायजर्स हैदराबाजने पॅट कमिन्स याच्या नेतृत्वात आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 18 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला. चेन्नई सुपर किंग्सने विजयासाठी दिलेलं 166 धावांचं आव्हान हैदराबादने 18.1 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. एडन मारक्रम हा हैदराबादकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. मारक्रम याने 50 धावा केल्या. तर अभिषेक शर्मा 37, ट्रेव्हिस हेड 31, शाहबाद अहमद 18, नीतीश रेड्डी 14* आणि हेन्रिक क्लासेन याने 10* धावांचं योगदान दिलं.

चेन्नईने ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात सलग 2 सामने जिंकत अप्रतिम सुरुवात केली. मात्र त्यानंतर चेन्नईचा हा सलग दुसरा पराभव ठरला. तर हैदराबादचा हा सलग दुसरा विजय ठरला. विशेष म्हणजे हैदराबादने दोन्ही सामने घरच्या मैदानात जिंकले. हैदराबादला विजयामुळे चांगलाच फायदा झाला आहे. तर चेन्नई सुपर किंग्सने आपलं स्थान कायम राखलंय. मात्र हैदराबाद विजयी झाल्याने पॉइंट्स टेबलमध्ये 2 संघांना फटका बसला आहे.

हैदराबादला फायदा

हैदराबादने या विजयानंतर सातव्या स्थानावरुन पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. हैदबादचा नेट रनरेट हा 0.409 इतका आहे. तो 4 एप्रिल रोजी सातव्या स्थानी असताना 0.204 इतका होता. तर हैदराबाद-चेन्नई सामन्याआधी पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर होते. सामन्यानंतर दोन्ही संघांना एका स्थानाचं नुकसान झालंय. ताज्या आकडेवारीनुसार, पंजाब सहाव्या आणि गुजरात सातव्या स्थानी आहेत. चेन्नईचा सामन्याआधी 0.976 नेट रनरेट होता तो पराभवानंतर 0.517 असा झाला आहे. तर टॉप 2 मध्ये कोलकाता नाईट रायर्डस आणि राजस्थान रॉयल्स दोन्ही संघ विराजमाना आहेत. दोन्ही संघांनी 3 पैकी 3 सामन्यात विजय मिळवले आहेत. मात्र राजस्थानच्या तुलनेत राजस्थानचा नेट रनरेट तगडा असल्याने ते पहिल्या स्थानी आहेत.

पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?

सनरायझर्स हैदराबाद प्लेईंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), अभिषेक शर्मा, एडन मारक्रम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, जयदेव उनाडकट, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि टी नटराजन.

चेन्नई सुपर किंग्ज प्लेईंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे आणि महेश तीक्षना.