आयपीएलच्या 17 व्या मोसमात 10 एप्रिलला राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये 24 वा सामना पार पडला. गुजरात टायटन्सने हा सामना 3 विकेट्सने जिंकला. राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सला विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं होतं. गुजरातने हे आव्हान शेवटच्या चेंडूवर पूर्ण केलं. गुजरातचा हा या हंगामातील तिसरा विजय आणि राजस्थानचा पहिला पराभव ठरला. या सामन्यानंतर ऑरेँज आणि पर्पल कॅप कुणाकडे आहे? हे जाणून घेऊयात.
राजस्थान रॉयल्सचा अनुभवी स्पिनर युझवेंद्र चहल याने पुन्हा एकदा पर्पल कॅप मिळवली आहे. चहलने चेन्नई सुपर किंग्सच्या मुस्तफिजुर रहमान याला मागे टाकत ही कॅप पटकावली. चहलने गुजरात विरुद्ध 2 विकेट्स घेतल्या आणि रहमानला पछाडलं. आता ताज्या आकडेवारीनुसार पर्पल कॅपच्या शर्यतीत टॉप 5 मध्ये अनुक्रमे युझवेंद्र चहल पहिल्या (10), मुस्तफिजुर रहमान दुसऱ्या (9), अर्शदीप सिंह तिसऱ्या (8), मोहित शर्मा चौथ्या (8) आणि खलील अहमद पाचव्या (7) स्थानी आहेत.
दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याच्याकडे ऑरेंज कॅप कायम आहे. विराटचा अपवाद वगळता टॉप 5 मध्ये अदलाबदल झाली आहे. राजस्थान विरुद्ध गुजरात या सामन्यात दोन्ही संघांच्या 4 फलंदाजांनी उल्लेनीय खेळी केली. त्याचा फायदा या चौघांना ऑरेंज कॅपच्या शर्यतीत झाला आहे. विराटनंतर टॉप 5 मध्ये राजस्थान आणि गुजरातचे प्रत्येकी 2 फलंदाज आहेत.
राजस्थानच्या रियान पराग आणि कॅप्टन संजू सॅमसन हे दोघे दुसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत. तर शुबमन गिल आणि साई सुदर्शन तिसऱ्या आणि पाचव्या स्थानी आहेत. रियान पराग आणि संजू सॅमसन या दोघांनी गुजरात विरुद्ध 76 आणि 68* अशा धावा केल्या. तर गुजरातकडून शुबमन आणि साईने 72 आणि 35 धावा केल्या. या चौघांना या खेळीचा फायदा झाला.
विराट कोहली याने 5 सामन्यात 316 धावा केल्या आहेत. रियान पराग 5 सामन्यातील 261 धावांसह दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. शुबमन गिल 6 सामन्यांमध्ये 255 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. संजू सॅमसन याने 4 मॅचमध्ये 246 रन्स केल्या आहेत. तर साई सुदर्शन याने 6 मॅचमध्ये 226 धावा केल्या आहेत.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन आणि युझवेंद्र चहल.
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), साई सुदर्शन, विजय शंकर, अभिनव मनोहर, मॅथ्यू वेड (विकेटकीर), राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, नूर अहमद आणि मोहित शर्मा.