शिखर धवन याच्या नेतृत्वात पंजाब किंग्सने गुजरात टायटन्सवर आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 17 व्या सामन्यात 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. गुजरात टायटन्सचा हा आपल्या होम ग्राउंड नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पहिला आणि एकूण दुसरा पराभव ठरला. गुजरातने पंजाबला विजयासाठी 200 धावांचं आव्हान दिलं होतं. पंजाबने हे आव्हान 19.5 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून पूर्ण केलं. शशांक सिंह हा पंजाबच्या विजयाचा शिल्पकार ठरला. शशांकने 29 बॉलमध्ये 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 61 धावांची खेळी केली.
गुजरातच्या गोलंदाजांना 200 धावांचा बचाव करता आला नाही. गुजरातकडून एकूण 6 गोलंदाजांनी बॉलिंग केली. सर्वांनी विकेट घेतल्या. पण एकालाही गुजरातसाठी निर्णायक भूमिका बजावता आली नाही. नूर अहमद याने एकट्याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. मोहित शर्मा याच्यासह 5 जणांनी 1-1 विकेट घेतली. मोहित शर्मा याने पंजाबचा ऑलराउंडर सिंकदर रझा याला आऊट केलं. मोहित शर्मा या 1 विकेट्सह पर्पल कॅपचा बादशाह ठरला आहे. गुजरातचा कॅप्टन शुबमन गिल याने सामन्यानंतर मोहित शर्माला पर्पल कॅप दिली.
मोहितचा इकॉनॉमी रेट हा मुस्तफिजुरच्या तुलनेत कमी आहे. मोहितचा इकॉनॉमी रेट 8.18 इतका आहे. तर मुस्तफिजुरचा तोच रेट 8.83 इतका आहे. याच एका कारणामुळे मोहित पर्पल कॅपचा मानकरी ठरला. आयपीएलच्या 17 व्या मोसमाच्या सुरुवातीपासून मुस्तफिजुरने पर्पल कॅपवर एकहाती वर्चस्व राखलं होतं. मोहितने अखेर मुस्तफिजूरला पछाडलं. मुस्तफिजुर बांगलादेशसाठी आयपीएल सोडून मायदेशी परतला आहे.
Virat Kohli continues to be the Orange Cap holder✅
Mohit Sharma becomes the new Purple Cap holder✅#MohitSharma #ViratKohli #KingKohli #GTvPBKS #GTvsPBKS #IPL #IPL2024 #Cricket #SBM pic.twitter.com/BiXfyZ9G3j— SBM Cricket (@Sbettingmarkets) April 4, 2024
मोहित शर्मा याने पर्पल कॅप काबीज केलीय. तर मुस्तफिजुर रहमान याची दुसऱ्या स्थानी घसरण झालीय. लखनऊचा मयंक यादव तिसऱ्या, राजस्थान रॉयल्सचा युझवेंद्र चहल चौथ्या आणि दिल्ली कॅपिट्ल्सचा खलील अहमद पाचव्या क्रमांकावर आहेत.
पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जितेश शर्मा (विकेटकीपर), प्रभसिमरन सिंग, सॅम करान, शशांक सिंग, सिकंदर रझा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा आणि अर्शदीप सिंग.
गुजरात टायटन्स प्लेईंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, केन विल्यमसन, विजय शंकर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव आणि दर्शन नळकांडे.