आयपीएलच्या 17 व्या हंगामात हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची पराभवाची मालिका सुरुच आहे. शुक्रवारी 3 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना पार पडला. या सामन्यात केकेआरने मुंबई विरुद्ध वानखेडे स्टेडियममध्ये तब्बल 12 वर्षांनी विजय मिळवला आणि प्रतिक्षा संपवली. केकेआरचा हा या हंगामातील एकूण 7 वा विजय ठरला. केकेआरने या विजयासह प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलंय. तर मुंबईचा कारभार आटोपला आहे.
कोलकाताने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 170 धावांचं आव्हान दिलं होतं. या विजयी धावांचा पाठलाग करताना मुंबईकडून सूर्यकुमार यादव याने 56 आणि टीम डेव्हिड याने 24 धावांची खेळी केली. तर इतरांनी निराशा केली. तर केकेआरकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर त्याआधी मुंबईने टॉस जिंकून केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईने केकेआरला 169 धावांवर 19.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट केलं. मुंबईकडून नवीन तुषारा आणि जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
जसप्रीत बुमराहने या 3 विकेट्ससह पुन्हा एकदा अवघ्या काही तासांनी पर्पल कॅप मिळवली. हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजनने 2 मे रोजी राजस्थान विरुद्ध विकेट्स घेत जसप्रीत बुमराहला मागे टाकत पर्पल कॅप मिळवली होती. मात्र आता बुमराहने 3 विकेट्स घेत हिशोब क्लिअर केला आहे. पर्पल कॅपच्या शर्यतीत पहिल्या 5 गोलंदाजांमध्ये अनुक्रमे जसप्रीत बुमराह, टी नटराजन, मुस्तफिजूर रहमान, हर्षल पटेल आणि सुनील नरेन यांचा समावेश आहे. या 5 गोलंदाजांच्या नावे अनुक्रमे 17,16,14,14 आणि 13 अशा विकेट्स आहेत.
बुम बुम बुमराह
𝗗𝗼𝘂𝗯𝗹𝗲 𝗗𝗲𝗹𝗶𝗴𝗵𝘁 ✌️
Jasprit Bumrah continues being in the race for the Purple Cap 👊
Watch the match LIVE on @JioCinema and @StarSportsIndia 💻📱#TATAIPL | #MIvKKR | @mipaltan pic.twitter.com/vq6R4CtVB2
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2024
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, नमन धीर, टीम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह आणि नुवान तुषारा.
कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती.