आयपीएलच्या 17 व्या मोसमात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सवर 9 धावांनी मात करत एकूण तिसरा विजय मिळवला. मुंबईने पंजाबसमोर विजयासाठी 193 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पंजाबने विजयी धावांचा पाठलाग करताना जोरदार झुंज दिली. मात्र अखेरच्या क्षणी मुंबईने कमबॅक केलं आणि बाजी मारली. पंजाबला ऑलआऊट 19.1 ओव्हरमध्ये 183 धावांपर्यंतच मजल मारता आली. पंजाबचे फलंदाज मुंबईच्या गोलदांजासमोर अपयशी ठरले. या सामन्यानंतर पर्पल कॅपच्या टॉप 5 शर्यतीत कोण कोण आहे? हे जाणून घेऊयात.
मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि गेराल्ड कोएत्झी या दोघांनी 3-3 विकेट्स घेतल्या. तर आकाश मढवाल, हार्दिक पंड्या आणि श्रेयस गोपाळ या तिघांनी 1-1 विकेट घेतली. जसप्रीत बुमराहने 3 विकेट्सह पर्पल कॅप पटकावली. त्याने राजस्थान रॉयल्सच्या युजवेंद्र चहल याला मागे टाकलं. तर गेराल्ड कोएत्झी तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. दोघांना 3-3 विकेट्स घेतल्याचा चांगला फायदा झाला. ताज्या आकडेवारीनुसार पर्पल कॅपच्या शर्यतीत पहिल्या पाचात जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, गेराल्ड कोएत्झी, खलील अहमद आणि कगिसो रबाडा यांचा समावेश आहे. या पाचही गोलंदाजांनी प्रत्येकी 7 सामने खेळले आहेत. त्यामध्ये पाच जणांनी अनुक्रमे 13, 12, 11, 10 आणि 10 अशा विकेट्स घेतल्या आहेत.
मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि गेराल्ड कोएत्झी या दोघांनी 4-4 ओव्हर बॉलिंग टाकली. बुमराहने 21 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स घेतल्या. बुमराहने फक्त 1 अतिरिक्त धाव दिली. तर गेराल्डने 6 एक्स्ट्रासह एकूण 32 धावा लुटवत 32 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स मिळवल्या. त्यामुळे एकूण सर्वच बाबतीत तुलना करायची झाली, तर बुमराहने मुंबईसाठी चिवट बॉलिंग केली. बुमराहच्या याच कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
बुमराह पर्पल कॅपचा बादशाह
– Purple Cap.
– POTM vs RCB.
– POTM vs PBKS.Jasprit Bumrah – The GOAT. 🐐 pic.twitter.com/08bFpaw0bT
— Johns. (@CricCrazyJohns) April 18, 2024
पंजाब किंग्स प्लेइंग ईलेव्हन : सॅम करन (कॅप्टन), रिली रोसो, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा आणि अर्शदीप सिंग.
मुंबई इंडियन्स प्लेईंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल आणि जसप्रीत बुमराह.