पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यानंतर पर्पल कॅप विजेता बदलला आहे. मुंबई इंडिनय्सचा स्टार गोलंदाज याच्याकडे असलेली पर्पल कॅप ही पंजाब किंग्सच्या गोलंदाजाने हिसकावली आहे. पंजाबचा गोलंदाज हर्षल पटेल याने आपल्या माजी संघाविरुद्ध 3 विकेट्स घेतल्या. हर्षल पटेल यासह आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 58 व्या सामन्यापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. हर्षलने बुमराला पछाडत मानाची पर्पल कॅप मिळवली. हर्षलच्या नावावर आता 20 विकेट्स झाल्या आहेत.
हर्षल पटेल याने आरसीबीच्या 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. विशेष म्हणजे हर्षलने आरसीबीच्या डावातील शेवटच्या म्हणजेच 20 व्या ओव्हरमध्येच या तिन्ही विकेट्स घेतल्या. हर्षलने अनुक्रमे दिनेश कार्तिक, महिपाल लोमरुर आणि कॅमरुन ग्रीन या तिघांना आऊट केलं. हर्षल या ओव्हरआधी फार महागडा ठरला होता. मात्र अखेरच्या ओव्हरमध्ये त्याने 3 विकेट्स घेत भरपाई केली. हर्षलने आपल्या 4 ओव्हरमध्ये 38 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स घेतल्या. हर्षलने यासह पर्पल कॅपचा मान मिळवला. पहिला डाव आटोपल्यानंतर विराट कोहली याच्या हस्ते हर्षल पटेल याला पर्पल कॅप देऊन सन्मानित करण्यात आलं .
हर्षलच्या नावे आता 12 सामन्यात 20 विकेट्स झाल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला हर्षलने पछाडल्याने जसप्रीत बुमराह याची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. बुमराहने 12 सामन्यात 18 विकेट्स घेतल्या आहे. तिसऱ्या स्थानी केकेआरचा वरुण चक्रवर्थी 11 सामन्यात 16 विकेट्ससह तिसऱ्या स्थानी आहे. चौथ्या क्रमांकावर पंजाबचा अर्शदीप सिंह आहे. अर्शदीपने आरसीबी विरुद्ध 1 विकेट घेतली आणि चौथ्या स्थानी झेप घेतली. अर्शदीपच्या नावावर 12 सामन्यात 16 विकेट्स आहेत. अर्शदीपच्या तुलनेत वरुणचं इकॉनॉमी रेट चांगलं असल्याने तो तिसऱ्या स्थानी आहे. तर पाचव्या स्थानी आता हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजन आहे. नटराजनने 10 सामन्यात 15 विकेट्स घेतल्या आहेत.
हर्षल पटेल पर्पल कॅपचा मानकरी
Orange cap holder Virat Kohli hands over the Purple cap to his former teammate Harshal Patel 😃 pic.twitter.com/RJmQdcJNhV
— CricTracker (@Cricketracker) May 9, 2024
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, महिपाल लोमरोर, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटीकपर), स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि लॉकी फर्ग्युसन.
पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : सॅम करन (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), प्रभसिमरन सिंग, रायली रोसो, शशांक सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, आशुतोष शर्मा, हर्षल पटेल, राहुल चहर, अर्शदीप सिंग आणि विद्वत कवेरप्पा.