आयपीएल स्पर्धेत गोलंदाजांना पर्पल कॅप मिळणं हा मोठा मान असतो. आयपीएलमध्ये आता 15 सामने पार पडले आहेत. मात्र पहिल्या दिवसापासून पर्पल कॅपचा साज एकाच गोलंदाजाच्या डोक्यावर सजला आहे. आतापर्यंत कोणीही त्याला धोबीपछाड देऊ शकलेला नाही. चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या बांगलादेशच्या मुस्तफिझुर रहमानला हा मान मिळाला आहे. तीन सामन्यात मुस्तफिझुर रहमान याने 7 गडी बाद केले आहेत. तर मयंक यादवने थेट दुसऱ्या स्थानावर धडक मारली आहे. तीन गडी बाद करत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.
तिसऱ्या स्थानावर युझवेंद्र चहलने धडक मारली आहे. त्याने 3 सामन्यात एकूण 6 गडी बाद केले आहेत. तर चौथ्या स्थानावर मोहित शर्मा आहे. त्यानेही 6 गडी बाद केले आहेत. मात्र युजवेंद्र चहलच्या तुलनेत इकोनॉमी रेट हा 7.75 इतका आहे. पाचव्या स्थानावर खलिल अहमद आहे. त्याने 3 सामन्यात पाच गडी बाद केले आहेत.
मुस्तफिजुर रहमानने पहिल्याच सामन्यात चार गडी बाद केले होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या चार फलंदाजांना तंबूत पाठवलं होतं. पहिल्या सामन्यातील स्पेलचा मुस्तफिझुर रहमान याला 15 व्या सामन्यापर्यंत फायदा झाला आहे. आता मयंक यादव युझवेंद्र चहल आणि मोहित शर्मा जवळ पोहोचले आहे. पुढच्या सामन्यातील कामगिरीवर आता पर्पल कॅपचा मानकरी बदलू शकतो. मयंक अग्रवालने 4 षटकात 14 धावा देत 3 गडी बाद केले.
गोलंदाज | सामने | इकॉनोमी | विकेट्स |
---|---|---|---|
मुस्तफिझुर रहमान | 3 | 8.83 | 7 |
मयंक यादव | 3 | 5.12 | 6 |
युजवेंद्र चहल | 3 | 5.50 | 6 |
मोहित शर्मा | 3 | 7.75 | 6 |
खलील अहमद | 4 | 8.18 | 6 |
दरम्यान, लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यात मयंक यादवने टॉप पाचमध्ये एन्ट्री मारली आहे. आरसीबीने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकात 5 गडी गमवून 181 धावा केल्या आणि विजयासाठी 182 धावांचं आव्हान दिलं. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ 19.4 षटकात सर्वबाद 153 धावा करू शकला. लखनौ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 28 धावांनी पराभव केला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत (विकेटकीपर), मयंक डागर, रीस टोपले, मोहम्मद सिराज, यश दयाल.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), देवदत्त पडिककल, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, यश ठाकूर, नवीन-उल-हक, मयंक यादव.