आयपीएल 2024 स्पर्धेत पर्पल कॅपची शर्यत रंगतदार होताना दिसत आहे. कारण फलंदाजांच्या या स्पर्धेत गोलंदाजांचा निभाव लागणं कठीण आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विकेट्स मिळवणं मोठ्या कष्टाचं काम झालं आहे. असं असूनही काही गोलंदाज चमकदार कामगिरी करत आहेत. प्रत्येक सामन्यात एखाद दोन विकेट्स घेत आपलं अस्तित्व दाखवत आहेत. शनिवारी पर्पल कॅपचा मान पंजाब किंग्सचा हर्षल पटेल याला मिळाला होता. मात्र मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या सामन्यात एक विकेट घेत हा मान जसप्रीत बुमराहला मिळाला आहे. जसप्रीत बुमराहचा इकोनॉमी रेट हा इतर गोलंदाजांपेक्षा खूपच चांगला आहे. त्यामुळे त्याच्याकडून कॅप खेचून जास्त काळ टिकवून ठेवणं कठीण आहे.
मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह 9 सामन्यात 36 षटकं टाकत 14 विकेट आणि 6.63 इकोनॉमी रेटसह पहिल्या स्थानी आहे. पंजाब किंग्सचा हर्षल पटेल 9 सामन्यात 32 षटकं टाकत 14 विकेट आणि 10.18 इकोनॉमी रेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युझवेंद्र चहल 9 सामन्यात 34 षटकं टाकत 13 विकेट आणि 9 इकोनॉमी रेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्सचा मुकेश कुमार 7 सामन्यात 25.3 षटक टाकत 13 विकेट आणि 11.05 इकोनॉमी रेटसह चौथ्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार कुलदीप यादव 7 सामन्यात 27 षटकं टाकत 12 विकेट आणि 8.51 इकोनॉमी रेटसह पाचव्या स्थानी आहे.
रविवार मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना रंगला. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 4 गडी गमवून 257 धावा केल्या. मात्र मुंबई इंडियन्सला 9 गडी गमवून 247 धावांपर्यंत मजल मारता आली. दिल्लीने मुंबई इंडियन्सला 10 धावांनी पराभूत केलं. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकात 5 गडी गमवून 196 धावा केल्या आणि विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान राजस्थान रॉयल्सने 19 षटकात पूर्ण केलं.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर कर्णधार), रोवमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकूर