मुंबई : आयपीएल 2024 च्या सीझनआधी झालेल्या सर्व संघांसाठी खेळाडू रिटेन आणि रिलीज करण्याची अंतिम तारीख होती. यामध्ये सर्वांचं लक्ष लागलेलं होतं ते म्हणजे हार्दिक पंड्या मुंबईमध्ये येणार का? सर्व संघांनी आपल्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली होती. यामध्ये गुजरात संघाने हार्दिक पंड्याला रिटेन केलं आहे. मात्र अजुनही हार्दिक मुंबईमध्ये जावू शकतो कसं ते जाणून घ्या.
मुंबई इंडियन्स संघाकडे आणखी एक संधी म्हणजे ट्रेडिंग विन्डो 12 डिंसेंबरपर्यंत सुरू असणार आहे. मुंबईसाठी मोठी अडचण म्हणजे त्यांच्याकडे आता 15 कोटी 25लाख आहेत. त्यामुळे हार्दिकला घ्यायचं असेल तर मुंबई इंडियन्सकडे अजुनही संधी आहे. मात्र सोशल माध्यमांवर एमआय आणि हार्दिकची डील झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे हार्दिकसाठी मुंबई दीड महिन्यासाठी आपले 15 कोटी लावताना दिसेल. मात्र यामध्येही अनेक त्रुटी आहेत.
सर्व संघांनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंमधील गुजरातने हार्दिकला रिटेन केलं आहे. त्यामुळे क्रीडा प्रेमी संभ्रमात पडले आहेत. अनेक माध्यमांनी याबाबत वृत्त दिल्याने या संभ्रमात आणखी वाढ झाली आहे. मुंबईने कॅमेरून ग्रीन याचा आरसीबीसोबत ट्रेड केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे मुंबईकडे हार्दिकला घेण्यासाठी पुरेसे पैसे आहेत.
दरम्यान, हार्दिक पंड्याची डील झाल्याचं बोललं जात असलं तरीसुद्धा ना हार्दिक पंड्या ना मुंबई इंडियन्सने याबाबत ऑफिशयल कोणतीच माहिती दिली नाही. आता हार्दिक आणि मुंबई इंडियन्सत्या ऑफिशियल सोशल माध्यमांवर कोणती पोस्ट केली तर याबाबत नेमका खुलासा होणार आहे.