IPL Retention 2025 Highlights : गुजरात टायटन्सकडून 5 खेळाडू रिटेन

| Updated on: Nov 01, 2024 | 2:01 AM

IPL 2025 Retention Highlights : आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनआधी सर्व रिटेन करण्यात आलेल्या खेळाडूंची नावं अखेर समोर आली आहेत. तर केएल राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत या आणि यासारख्या स्टार खेळाडूंना करारमुक्त करण्यात आलं आहे. पाहा कोणत्या संघांनी कोणत्या खेळाडूंना रिलीज केलं आहे.

IPL Retention 2025 Highlights : गुजरात टायटन्सकडून 5 खेळाडू रिटेन
IPL Retention 2025
Image Credit source: IPL
Follow us on

आयपीएलच्या 18 व्या मोसमाच्या ऑक्शनआधी 31 ऑक्टोबरला एकूण 10 फ्रँचायजींनी रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. सनरायर्स हैदराबादचा हेन्रिक क्लासेन हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. तर विराट कोहली सर्वात महाग भारतीय खेळाडू ठरला आहे. एकूण 4 संघांच्या खेळाडूंना रिलीज करण्यात आलं आहे. काही खेळाडूंवर भरभरुन पैसा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे या संघांसमोर आता ऑक्शनमध्ये उर्वरित रक्कमेतून खेळाडू आपल्या ताफ्यात घेण्याचं आव्हान असणार आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Nov 2024 01:47 AM (IST)

    गुजरात टायटन्सकडून 5 खेळाडू रिटेन

    गुजरात टायटन्सकडून 5 खेळाडूंना रिटेन करण्यात आलं आहे. गुजरातने राशिद खान याला सर्वाधिक 18 कोटी रुपये देत रिटेन केलंय. तर कॅप्टन शुबमन गिल याला 16 कोटी 50 लाख रुपयात रिटेन केलं. साई सुदर्शनला 8 कोटी 50 लाख रुपयात रिटेन केलं आहे. तर राहुल तेवतिया आणि शाहरुख खान या दोघांना प्रत्येकी 4-4 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

  • 01 Nov 2024 01:40 AM (IST)

    लखनऊकडून 5 खेळाडू रिटेन

    लखनऊ सुपर जायंट्सने एकूण 5 खेळाडूंना रिटेन केलं आहे.लखनऊने निकोलस पूरन याला 21 कोटी रुपये दिले आहेत. रवी बिश्नोई आणि मयंक यादव या दोघांना प्रत्येकी 11-11 कोटी रुपये दिले आहेत. तर मोहसिन खान आणि आयुष बदोनी या दोघांना प्रत्येकी 4-4 कोटी रुपयांसह रिटेन केलं आहे.

    लखनऊचे 5 स्टार खेळाडू


  • 01 Nov 2024 01:35 AM (IST)

    पंजाबकडून दोघे रिटेन, एकूण 9 कोटी 50 लाख खर्च

    पंजाब किंग्सने एकूण 2 खेळाडूंना रिटेन केलं आहे. पंजाबने शशांक सिंह आणि प्रभसिमरन सिंह या दोघांना रिटेन केलं आहे. शशांकला 5 कोटी 50 लाख तर प्रभसिमरनला 4 कोटी रुपये मिळाले आहेत.

    पंजाबकडून दोघेच रिटेन

  • 01 Nov 2024 01:31 AM (IST)

    हैदराबादकडून ओत पैसा, हेन्रिक क्लासेन मालामाल

    हैदराबादकडून खेळाडूंवर भरघोस पैसा खर्च करण्यात आला आहे. हैदराबादने हेन्रिक क्लासेन याला सर्वाधिक 23 कोटी रुपये खर्च करुन रिटेन केलं आहे. पॅट कमिन्सला 18 कोटी रुपये मिळालेत. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड या दोघांना प्रत्येकी 14-14 कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं आहे. तर नीतीश कुमार रेड्डीला 6 कोटी रुपयात रिटेन करण्यात आलं आहे.

    हैदराबादकडून रिटेन केलले खेळाडू

     

  • 01 Nov 2024 01:25 AM (IST)

    दिल्लीकडून ऋषभ पंत रिलीज, रिटेन कोण?

    दिल्ली कॅपिट्ल्सने ऋषभ पंत याला रिलीज केलं आहे. तर अक्षर पटेल हा दिल्लीचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. दिल्लीने अक्षर पटेल 16 कोटी 50 लाख रुपयात रिटेन केलं गेलं आहे. तर कुलदीप यादव याला 13 कोटी 25 लाख, ट्रिस्टन स्टब्स 10 कोटी आणि अभिषेक पोरेल याला 4 कोटीमध्ये रिटेन केलंय.

    दिल्लीकडून चौघे रिटेन

  • 01 Nov 2024 01:17 AM (IST)

    केकेआरकडून 6 खेळाडू रिटेन

    कोलकाता नाईट रायडर्सने 6 खेळाडूंना रिटेन केलं आहे. केकेआरने रिंकु सिंहला सर्वाधिक 13 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन आणि आंद्रे रसेल या तिघांना प्रत्येकी 12-12 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर हर्षित राणा आणि रमनदीप सिंह या दोघांना 4-4 कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं गेलं आहे. हर्षित आणि रमनदीप या दोघांचा अनकॅप्ड खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.

    केकेआरचे 6 खेळाडू

  • 31 Oct 2024 07:57 PM (IST)

    राजस्थानकडून 6 खेळाडू रिटेन,यशस्वी-संजूचा समावेश

    राजस्थान रॉयल्सने एकूण 6 खेळाडूंना आयपीएलच्या आगामी 18 व्या मोसमासाठी रिटेन केलं गेलं आहे. या 6 खेळाडूंमध्ये संजू सॅमसन,यशस्वी जयस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर आणि संदीप शर्मा यांचा समावेश आहे.

    राजस्थानकडून 6 खेळाडू रिटेन

     

  • 31 Oct 2024 06:58 PM (IST)

    सीएसकेकडून 5 खेळाडू रिटेन, महेंद्रसिंह धोनी याच्यासह आणखी कोण?

    आयपीएलच्या इतिहासातील दुसरी सर्वात यशस्वी टीम चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी एकूण 5 खेळाडूंना रिटेन केलं आहे. सीएसकेने माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवलं आहे. तर कर्णधार ऋतुराज गायकवाड, ऑलराउंडर रवींद्र जडेजा, शिवम दुबे आणि मथीशा पथीराना यांनाही रिटेन केलं आहे.

    चेन्नईचे पंचरत्न

  • 31 Oct 2024 06:17 PM (IST)

    आरसीबीकडून विराटसह 3 खेळाडू रिटेन, 1 अनकॅप्ड

    आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी फक्त 3 खेळाडूंनाच रिटेन केलं आहे. या तिघांमध्ये 2 कॅप्ड आणि 1 अनकॅप्ड खेळाडूचा समावेश आहे. आरसीबीने विराट कोहली, रजत पाटीदार आणि यश दयाल या तिघांना रिटेन केलं आहे.

    आरसीबीला या त्रिकुटावर विश्वास

     

  • 31 Oct 2024 05:36 PM (IST)

    मुंबईकडून 5 खेळाडू रिटेन, सर्वाधिक रक्कम कुणाला?

    मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी 5 खेळाडू रिटेन केले आहेत.  या 5 खेळाडूंमध्ये हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा यांचा समावेश आहे.

    मुंबईकडून हे 5 खेळाडू कायम

     

  • 31 Oct 2024 04:08 PM (IST)

    आयपीएल 2025 रिटेन्शनबाबत काही महत्त्वाचे मुद्दे

    मेगा ऑक्शनसाठी प्रत्येक टीमला 120 कोटी रुपये मिळणार आहेत. प्रत्येक टीमला राईट टु मॅच कार्डसह जास्तीत जास्त 6 खेळाडू कायम राखता येणार आहेत. एका संघाने 5 खेळाडू रिटेन केल्यास त्यांच्या कोट्यातली 75 कोटी रुपये खर्च होतील. त्यामुळे त्या संबंधित संघाकडे ऑक्शनसाठी 45 कोटी रुपयांची रक्कम शिल्लक राहिल.

    या हिशोबाने 5 खेळाडूंसाठी 75 कोटी रुपये

  • 31 Oct 2024 03:27 PM (IST)

    IPL Retention 2025 Live Updates : आयपीएल रिटेन्शन लाईव्ह कुठे पाहता येणार?

    आयपीएल 2025 रिटेन्शन मोबाईलवर पाहण्यासाठी जिओ सिनेमा एप असणं महत्त्वाचं आहे. जिओ सिनेमा एपवर थोड्याच वेळात 4 वाजून 30 मिनिटांनी लाईव्ह पाहता येणार आहे. तर टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.