Irani Trophy 2024 : मुंबई संघाची रेस्ट ऑफ इंडियाविरुद्ध पहिल्याच दिवशी छाप, अजिंक्य रहाणे-श्रेयस अय्यर चमकले

| Updated on: Oct 01, 2024 | 4:34 PM

इराणी ट्रॉफी 2024 स्पर्धेत मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया अशी लढत होणार आहे. रणजी स्पर्धेतील अंतिम विजेता संघ आणि रेस्ट इंडिया यांच्यात हा सामना होतो. मागच्या पर्वात मुंबईने रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. त्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया असे संघ आमनेसामने आले आहेत.

Irani Trophy 2024 : मुंबई संघाची रेस्ट ऑफ इंडियाविरुद्ध पहिल्याच दिवशी छाप, अजिंक्य रहाणे-श्रेयस अय्यर चमकले
Follow us on

इराणी ट्रॉफी 2024 स्पर्धेत मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया हे संघ आमनेसामने आले आहेत. रणजी ट्रॉफी विजेता संघ आणि रेस्ट ऑफ इंडियाचे खेळाडू या स्पर्धेत एकमेकांसमोर उभे ठाकतात. मागच्या पर्वात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात मुंबईने जेतेपदावर नाव कोरलं होतं. दुसरीकडे, रेस्ट ऑफ इंडिया संघाची धुरा ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर दिली आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल ऋतुराज गायकवाडच्या बाजूने लागला. ऋतुराजने लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमचा अंदाज घेत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात मुंबईच्या डावाची सुरुवात खराब झाली. आघाडीचे तीन फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे जबाबदारी मधल्या फळीवर आली. पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे आणि हार्दिक तामोरे स्वस्तात बाद झाले. हार्दिकला तर खातंही खोलता आलं नाही. 37 धावांवर 3 गडी बाद अशी स्थिती होती. अशा परिस्थितीत कर्णधार अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर यांची भागीदारी महत्त्वाची ठरली. चौथ्या विकेटसाठी या दोघांनी 102 धावांची भागीदारी केली. श्रेयस अय्यर 84 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकार मारत 57 धावा करून बाद झाला. यश दयालने त्याला तंबूचा रस्ता दाखवला.

श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे चिवट खेळी सुरुच ठेवली. पाचव्या विकेटसाठी सरफराज खानसोबत चांगली भागीदारी केली. अजिंक्य रहाणने शतकाच्या दिशेने कूच केली आहे. तर सरफराज खानने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. त्यामुळे पहिल्या दिवस मुंबईच्या फलंदाजांनी गाजवला असंच म्हणावं लागेल. मुकेश कुमारने पहिल्या सत्रात चांगली गोलंदाजी केली. तर यश दयालने श्रेयस अय्यर बाद करत मोठी भागीदारी फोडून काढली. या व्यतिरिक्त प्रसिद्ध कृष्णा, मानव सुथार आणि सारांश जैन यांना यश मिळालं नाही.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

मुंबई (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), सरफराज खान, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, एम जुनेद खान, मोहित अवस्थी.

रेस्ट ऑफ इंडिया (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, अभिमन्यू ईश्वरन, साई सुधरसन, इशान किशन, ध्रुव जुरेल (डब्ल्यू), मानव सुथार, सरांश जैन, यश दयाल, मुकेश कुमार, प्रसीद कृष्णा