नवी दिल्ली : राशिद खान (Rashid Khan) हा टी-20 (T-20)चा दिग्गज खेळाडू मानला जातो. या खेळाडूने ते पुन्हा एकदा सिद्ध केले. आयर्लंड विरुद्धच्या चौथ्या T20 मध्ये (IRE vs AFG) त्याने बॅट आणि बॉल दोन्हीसह कामगिरी केली. अशाप्रकारे अफगाणिस्ताननं हा सामना 27 धावांनी जिंकला आणि 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी झाली. एकवेळ संघ मालिकेत 0-2 ने पिछाडीवर होता. पावसामुळे सामना 11-11 षटकांचा करण्यात आला. अफगाणिस्ताननं प्रथम खेळताना 6 बाद 132 धावा केल्या. प्रत्युत्तरात यजमान आयर्लंडचा संघ 105 धावा करून बाद झाला. या मालिकेतील अंतिम सामना उद्या होणार आहे. या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानने वेगवान सुरुवात केली. पण त्यांनी 76 धावांत 5 मोठे विकेट गमावले. यानंतर राशिद खान आणि नजीबुल्ला जद्रान यांनी 18 चेंडूत 50 धावांची भागीदारी करत संघात पुनरागमन केले. हाही सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. नजीबुल्लाहने 24 चेंडूत 50 धावा केल्या. स्ट्राइक रेट 208 होता. त्याने 4 चौकार आणि 3 षटकारही मारले.
रशीद खान 10 चेंडूत 31 धावा करत नाबाद राहिला. त्याचा स्ट्राईक रेट 310 होता. या डावात त्याने एक चौकार आणि तीन षटकार मारले. म्हणजेच चौकारावरून 22 धावा झाल्या. सलामीवीर फलंदाज रहमतुल्ला गुरबाजनेही 13 चेंडूत 24 धावांचे योगदान दिले. 3 चौकार आणि 2 षटकार मारले. लेगस्पिनर गॅरेथ डेन्लीने आयर्लंडसाठी शानदार गोलंदाजी केली. त्याने 3 षटकात 33 धावा देत 3 बळी घेतले. संघाच्या सर्व 6 गोलंदाजांनी 10 च्या वरच्या इकॉनॉमीमधून धावा लुटल्या.
फगाणिस्ताननं हा सामना 27 धावांनी जिंकला आणि 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी झाली. एकवेळ संघ मालिकेत 0-2 ने पिछाडीवर होता. पावसामुळे सामना 11-11 षटकांचा करण्यात आला.