डब्लिन | आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील बहु्प्रतिक्षित मालिकेला अखेर 18 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. बीसीसीआय निवड समितीने या आयर्लंड दौऱ्यावर अनेक युवा खेळाडूंना संधी दिलेली आहे. यामध्ये प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंह, जितेश शर्मा आणि शहबाज अहमद यांना संधी दिली आहे. आतापर्यंत टी 20 डेब्यूची संधी मिळालेली नाही. त्यामुळे या दौऱ्यात या चौघांचं टी 20 डेब्यू होणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराज गायकवाड याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
तसेच आयर्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेतून जसप्रीत बुमराह याचं कमबॅक होणार आहे. जसप्रीत बुमराह हा 2022 पासून दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर होता. मात्र अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर जसप्रीत बुमराह याचं कमबॅक होणार असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. बुमराह याच्याकडेच या मालिकेचं नेतृत्व देण्यात आलं आहे. त्यामुळे या पहिल्या सामन्यात टॉससाठी येताच जसप्रीत बुमराह इतिहास रचणार आहे.
जसप्रीत बुमराह टीम इंडियाचं टी 20 क्रिकेटमध्ये कॅप्टन्सी करणारा एकूण 11 वा खेळाडू ठरले. विशेष म्हणजे जसप्रीत बुमराह टीम इंडियाचं टी 20 सीरिजमध्ये कॅप्टन्सी करणारा पहिला गोलंदाज ठरेल.
दरम्यान आतापर्यंत टीम इंडियाच टी 20 क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवाग, एमएस धोनी, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या आणि केएल राहुल या 10 जणांनी आतापर्यंत नेतृत्व केलं आहे.
टी 20 सीरिजसाठी आयर्लंड क्रिकेट टीम | पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्रयू बालबर्नी, मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, थिओ व्हॅन वोरकॉम, बेन व्हाइट आणि क्रेग यंग.
आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया | जस्प्रीत बुमराह (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग , मुकेश कुमार आणि आवेश खान.