IND vs IRE 1st T20 | आयर्लंड विरुद्ध टीम इंडियाकडून ‘या’ दोघांना पदार्पणाची संधी मिळणार!

| Updated on: Aug 18, 2023 | 12:01 AM

Ireland vs India 1st T20I Match | आयर्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेतील पहिल्या सामन्यात कॅप्टन जसप्रीत बुमराह 2 खेळाडूंना पदार्पणाची संधी देऊ शकतो.

IND vs IRE 1st T20 | आयर्लंड विरुद्ध टीम इंडियाकडून या दोघांना पदार्पणाची संधी मिळणार!
Follow us on

डब्लिन | वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20 मालिका गमावल्यानंतर आता टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध टी 20 मालिकेत भिडणार आहे. या मालिकेत टीम इंडियाचे जवळपास सर्वच युवा खेळाडू आहेत. या युवा ब्रिगेडचं नेतृत्व जसप्रीत बुमराह करणार आहे. तर ऋतुराज गायकवाड याच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. या मालिकेतील पहिला सामना 18 ऑगस्ट रोजी द व्हिलेज डब्लिन इथे खेळवण्यात येणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाकडून दोघांना पदार्पणाची संधी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.

ते दोघे कोण?

टीम इंडियाकडून रिंकू सिंह आणि जितेश शर्मा या दोघांना पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. रिंकू सिंह याचा टीम इंडियासाठी पहिलाच दौरा आहे. तर जितेश शर्मा याची याआधी श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत निवड करण्यात आली होती. मात्र त्याला दोन्ही मालिकेत संधी काही मिळाली नाही. त्यामुळे या दोघांना पहिल्या सामन्यात संधी मिळणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे.

रिंकू सिंह

रिंकू सिंह याने आयपीएल 16 व्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना गुजरात टायटन्सच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावून घेतला होता. रिंकूने 5 बॉलमध्ये 5 सिक्स ठोकून केकेआरला सनसनाटी विजय मिळवून दिला होता. रिंकूच्या कारकीर्दीतील हा टर्निंग पॉईंट ठरला. रिंकूला या खेळीच्याच जोरावर पहिल्यांदाच टीम इंडियात खेळण्याची संधी देण्यात आली. तसेच रिंकूची आगामी एशियन गेम्ससाठीही निवड करण्यात आलेली आहे.

हे सुद्धा वाचा

जितेश शर्मा

जितेश शर्मा या अमरावतीकर पोट्ट्याला गेल्या 2 मालिकेपासून पदार्पणासाठी प्रतिक्षा करावी लागली आहे. मात्र संधी काही मिळाली नाही. मात्र आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळताना जितेशने आपली कामगिरी दाखवून दिली आहे. जितेश विकेटकीपरही आहे. त्यामुळे जितेश शर्मा याच्या रुपात टीम इंडियाला आणखी एक विकेटकीपर बॅट्समन असा खेळाडू मिळेल.

टी 20 सीरिजसाठी आयर्लंड क्रिकेट टीम | पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्रयू बालबर्नी, मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, थिओ व्हॅन वोरकॉम, बेन व्हाइट आणि क्रेग यंग.

आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया | जस्प्रीत बुमराह (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग , मुकेश कुमार आणि आवेश खान.