Jasprit Bumrah | कॅप्टन होताच जसप्रीत बुमराह याला आपल्याच बॉलरपासून धोका

| Updated on: Aug 18, 2023 | 6:46 PM

Ireland vs India 1st T20I | जसप्रीत बुमराह याच्याकडे आयर्लंड दौऱ्यात टीम इंडियाच्या कर्णधारपदाची सूत्र देण्यात आली आहेत.

Jasprit Bumrah | कॅप्टन होताच जसप्रीत बुमराह याला आपल्याच बॉलरपासून धोका
team india jasprit bumrah
Follow us on

डब्लिन | आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया टी 20 मालिकेतील पहिल्या सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होणार आहे. टीम इंडियातील जवळपास सर्वच खेळाडू हे युवा आहेत. त्यामुळे आयर्लंड विरुद्धच्या या मालिकेसाठी सर्वच खेळाडू हे उत्साही आहेत. जसप्रीत बुमराह इंज्युरीनंतर 11 महिन्यांनी कॅप्टन होऊन टीम इंडियात परतला. त्यामुळे बुमराह कॅप्टन म्हणून कशी कामगिरी करतो, याकडे क्रिकेट चाहच्यांचं लक्ष असणार आहे. तर टीम इंडियाच्या अर्शदीप सिंह याला पहिल्याच सामन्यात मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे.

जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा टॉपचा बॉलर आहे. बुमराहच्या अनुपस्थितीत गेली 11 महिने टीम इंडियाची काय अवस्था झाली, हे क्रिकेट विश्वाने पाहिलं. बुमराह नसताना अनेकांना संधी देण्यात आली. मात्र कुणालाही प्रभावित करता आलं नाही. बुमराहने आतापर्यंत टीम इंडियसाठी अनेक सामने जिंकून दिले आहेत. बुमराहच्या नावावर अनेक विक्रम आहेत. बुमराहने टी 20 क्रिकेटमध्ये वेगवान विकेट्सचं अर्धशतक पूर्ण केलं आहे. अर्शदीप सिंह हा देखील आता बुमराहच्या जवळ येऊन ठेपला आहे.

अर्शदीपला बुमराहचा रेकॉर्ड ब्रेक करायची संधी आहे. बुमराहने 41 सामन्यात 50 विकेट्स पूर्ण केल्या होत्या. तर अर्शदीपने आतापर्यंत 31 मॅचमध्ये 48 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे अर्शदीपला बुमराहचा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी 2 विकेट्सची गरज आहे

हे सुद्धा वाचा

अर्शदीप सिंह याची टी 20 कारकीर्द

अर्शदीपने टी 20 क्रिकेटमध्ये 31 सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. अर्शदीपने या 31 सामन्यात 18.43 च्या सरासरीने आणि 8.52 च्या इकॉनॉमी रेटने 48 फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवलाय. अर्शदीपची 37 धावा देऊन 4 विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.

आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया | जस्प्रीत बुमराह (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग , मुकेश कुमार आणि आवेश खान.