IRE vs IND 1st T20I | टीम इंडियाने टॉस जिंकला, या दोघांचं पदार्पण

| Updated on: Aug 18, 2023 | 7:33 PM

IRE vs IND 1ST T20I | टीम इंडियाने आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात टॉस जिंकला आहे. टीम इंडियाकडून दोघांना डेब्यूची संधी दिली आहे.

IRE vs IND 1st T20I | टीम इंडियाने टॉस जिंकला, या दोघांचं पदार्पण
Follow us on

डब्लिन | आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकला आहे. कॅप्टन जसप्रीत बुमराह याने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाकडून दोघाांनी पदार्पण केलं आहे. स्टार बॅट्समन रिंकू सिंह आणि बॉलर प्रसिद्ध कृष्णा या दोघांनी टी 20 डेब्यू केलं आहे. विशेष म्हणजे रिंकू सिंह याचं हे आंतरराष्ट्रीय पदार्पण ठरलं आहे. सामन्याचं आयोजन हे डब्लिनमधील द व्हिलेज इथे करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

टीम इंडियाचे 11 शिलेदार

हे सुद्धा वाचा

रिंकू आणि प्रसिद्धची एन्ट्री

आयर्लंड विरुद्धच्या या पहिल्या सामन्यातून जसप्रीत बुमराह याने टीम इंडियाकडून रिंकू सिंह आणि प्रसिद्ध कृष्णा या दोघांना पदार्पण करण्याची संधी दिली. रिंकू याचं पहिल्याच सामन्यातून डेब्यू होणार, हे निश्चित होतं. तर अमरावतीकर जितेश शर्मा याचं नाव पदार्पणासाठी आघाडीवर होतं. मात्र जितेशऐवजी प्रसिद्धची एन्ट्री झाली. त्यामुळे जितेशला पदार्पणासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

दरम्यान कॅप्टन बुमराह याने प्रसिद्ध आणि रिंकू या दोघांना कॅप दिली. यावेळेस हडल टॉकदरम्यान इतर सहकारी खेळाडूंनी रिंकू आणि प्रसिद्ध या दोघांचं अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया दोन्ही संघ एकूण 5 वेळा आमनेसामने आले आहेत. या 5 सामन्यात टीम इंडियानेच विजय मिळवला आहे. त्यामुळे टीम इंडियाच आकडेवारीच्या हिशोबाने आयर्लंडवर वरचढ आहे.

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | जसप्रीत बुमराह (कॅप्टन) ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई.

आयर्लंड प्लेईंग इलेव्हन | पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग, ​​जोशुआ लिटल आणि बेंजामिन व्हाइट.