मुंबई | आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा सोमवारी 21 ऑगस्टला होणार आहे. नवी दिल्लीत टीम इंडियाची घोषणा करण्यासाठी निवड समितीची बैठक पार पडणार आहे. आता निवड समिती आणि कॅप्टन रोहित शर्मा कोणत्या नावांना पसंती देतात, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. तिलक वर्मा या युवा बॅट्समन तगडा दावेदार समजला जात आहे. तिलकला संधी द्यायला हवी, असं आजी माजी क्रिकेटपटूंनीही म्हटलं आहे. आता तिलकला संधी मिळणार की नाही हे सोमवारी स्पष्ट होईल. मात्र टीमची निवड होण्याच्या 24 तासांआधी तिलक वर्मा सपशेल अपयशी ठरला आहे.
तिलक वर्मा याने वेस्ट इंडिज विरुद्ध 2 आठवड्यांआधी इंटरनॅशनल डेब्यू केलं. तिलकने पहिल्याच सामन्यात शानदार कामगिरी करत आपली छाप सोडली. तिलकने टीम इंडियाकडून विंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेत सर्वाधिक धावा केल्या. त्यामुळे तिलक आयर्लंड विरुद्ध कशी कामगिरी करतो, याकडे सर्वाचंच लक्ष होतं. मात्र तिलकला दोन्ही सामन्यात आपली छाप सोडता आली नाही.
तिलकला आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात खातंही खोलता आलं नाही. तिलक पहिल्याच बॉलवर आऊट झाला. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात तिलककडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. पण दुसऱ्या सामन्यातही तेच. तिलकने दुसऱ्या सामन्यात फक्त 1 धाव करुन आऊट झाला. तिलक अशाप्रकारे आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यात 3 बॉल खेळून 2 वेळा आऊट झाला. आशिया कपसाठी भारतीय संघाची निवड होण्यााधी तिलकचे हे आकडे आहेत. विंडिज विरुद्ध धमाका केल्याने तिलकचं नाव आशिया कपसाठी आघाडीवर आलं.
आता तिलकच्या या फ्लॉप शोचा निवड समितीवर काही परिणाम होतो की नाही, हे येत्या काही तासात स्पष्ट होईलच. त्यामुळे निवड समिती तिलकवर विश्वास दाखवून त्याला संधी देते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेलच.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | जसप्रीत बुमराह (कॅप्टन) ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई.
आयर्लंड प्लेईंग इलेव्हन | पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग, जोशुआ लिटल आणि बेंजामिन व्हाइट.