मुंबई : टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून आता एकदिवसीय मालिका सुरू आहे. कसोटी मालिका जिंकल्यानंतर आता टीम इंडियाचा एकदिवसीय मालिका जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. पहिला सामना जिंकल्यानंतर आज म्हणजेच शनिवारी संध्याकाळी हा सामना होणार आहे. या सामन्यात विजय मिळवल्यावर टीम इंडिया मालिका खिशात घालणार आहे. अशातच आयसीसीने ट्विट करत मोठी मोठी घोषणा केली आहे.
टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची सांगता टी-२० मालिकेने होणार आहे. टी-२० मालिकेमधील शेवटचा सामना १३ ऑगस्टला होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. आयसीसीने याबाबत माहितील दिली आहे. १८ ऑगस्ट, २० ऑगस्ट आणि २३ ऑगस्टला हे तीन सामने होणार आहेत. या मालिकेसाठी युवा खेळाडूंचा संघ पाठवला जाण्याची शक्यता आहे. कारण वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर टीम मॅनेजमेंट हा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
टीम इंडियासाठी वन डे सामने आता महत्त्वाचे असणार आहेत. कारण यंदाच्या वर्ल्ड कपचं आयोजन भारतात असल्याने टीम इंडिया विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. त्यामुळे संघासाठी वन डे सामन्यांकडे जास्तीत जास्त टीम इंडियाचं लक्ष असणार आहे. सीनिअर संघाच्या ऐवजी बीसीसीआय युवा खेळाडूंना हे सामने खेळवण्यासाठी पाठवू शकतो.
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, पहिला सामना, 18 ऑगस्ट.
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, दुसरा सामना, 20 ऑगस्ट.
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, तिसरा सामना, 23 ऑगस्ट.
दरम्यान, ५ ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्ड कपच्या थराराला सुरूवात होणार आहे. पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघांमध्ये होणार आहे. तर टीम इंडियाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियासोबत पार पडला जाणार आहे.