डब्लिन | आशिया कप 2023 आधी टीम इंडियाची युवा ब्रिगेड आयर्लंड दौऱ्यावर आहे. टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हा 18 ऑगस्टला खेळवण्यात येणार आहे. जसप्रीत बुमराह या यंग ब्रिगेडचा कॅप्टन आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध 5 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाचा 2-3 अशा फरकाने पराभव झाला होता. त्यामुळे आता टीम इंडियासमोर आयर्लंड विरुद्ध चांगली कामगिरी करण्याचं आव्हान असणार आहे. टीम इंडियाने गेल्याने वर्षी आयर्लंड विरुद्ध टी 20 मालिका जिंकली होती. दरम्यान आता या 3 सामन्यांच्या मालिकेनिमित्त पहिला सामना कधी आणि कुठे पाहता येणार, याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड यांच्यातील पहिला टी 20 सामना हा 18 ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहे.
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20 सामना हा द व्हिलेज, डब्लिन इथे आयोजित करण्यात आला आहे.
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिल्या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20 सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहता येईल.
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20 सामना हा टीव्हीवर स्पोर्ट्स 18 या चॅनेलवर पाहायला मिळेल.
टी 20 सीरिजसाठी आयर्लंड क्रिकेट टीम | पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्रयू बालबर्नी, मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, थिओ व्हॅन वोरकॉम, बेन व्हाइट आणि क्रेग यंग.
आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया | जस्प्रीत बुमराह (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग , मुकेश कुमार आणि आवेश खान.