मुंबई | भारतीय क्रिकेट नियमाक मंडळ अर्थात बीसीसीआयने आयर्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. टीम इंडिया या टी 20 मालिकेसाठी आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 3 सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीायने 15 सदस्यीय संघ निवडलाय. बीसीसीआयने याबाबत ट्विट करत माहिती दिलीय.
या टी 20 मालिकेतून प्रसिद्ध कृष्णा जस्प्रीत बुमराह या दोघांनी अनेक महिन्यांनी टीममध्ये एन्ट्री झाली. जसप्रीत बुमराह टीम इंडियाचं कर्णधारपद सांभाळणार आहे. तर मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड याला थेट उपकर्णधार करण्यात आलंय. टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आलीय. रिंकू सिंह याला संधी दिली गेलीय. तसेच काही खेळाडूंचं अनेक वर्षांनी पुनरागमन झालंय.
निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी मुंबईकर ऑलराउंडरला संधी देत त्याची क्रिकेट कारकीर्द वाचवलीय. मुंबईचा ऑलराउंडर खेळाडू शिवम दुबे याची टीम इंडियात तब्बल 3 वर्षांनी एन्ट्री झालीय. शिवम दुबे याने अखेरचा टी 20 सामना हा 2 फेब्रुवारी 2020 रोजी खेळला होता. तेव्हापासून टीम इंडियाने असंख्य टी 20 मालिका खेळल्या मात्र शिवम दुबे याचा विचार करण्यात आला नाही. मात्र अजित आगरकर यांनी विश्वास दाखवत शिवमला संधी दिली.
शिवम दुबे सुरु असलेल्या देवधर ट्रॉफी स्पर्धेत वेस्ट झोनचं प्रतिनिधित्व करतोय. या स्पर्धेतील 10 व्या सामन्यात नॉर्थ झोन विरुद्ध विस्फोटक खेळी करुन जिंकून दिलं. शिवमने नॉर्थ झोनविरुद्ध 78 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 3 फोरच्या मदतीने नॉट आऊट 83 रन्स केल्या. शिवमने या खेळीसह वेस्ट झोनच्या विजयात मोठी भूमिका बजावली.
शिवम दुबे याने टीम इंडियाचं 1 वनडे आणि 13 टी 20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलंय. दुबेने वनडेमध्ये 47 आणि टी 20 मध्ये 216 रन्स केल्या आहेत.
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, पहिला सामना, 18 ऑगस्ट.
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, दुसरा सामना, 20 ऑगस्ट.
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, तिसरा सामना, 23 ऑगस्ट.
आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया | जस्प्रीत बुमराह (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड (व्हीसी), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग , मुकेश कुमार आणि आवेश खान.