डबलिन | टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20 मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. एकूण 3 सामन्यांची ही मालिका असणार आहे. या आयर्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच 31 जुलै रोजी भारतीय संघाची घोषणा केली आहे. जसप्रीत बुमराह या मालिकेत भारतीय संघाचं नेृतत्व करणार आहे. तर ऋतुराज गायकवाड याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
तर आयर्लंडने 4 ऑगस्ट रोजी 15 सदस्यीय संघ घोषित केला. पॉल स्टर्लिंग हा आयर्लंड क्रिकेट टीमचं नेतृत्व करणार आहे. ही टी 20 मालिका कुठे पाहता येणार, याबाबत क्रिकेट चाहत्यांना प्रश्न पडला आहे. याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील टी 20 मालिकेतील सामने मोबाईलवर जिओ सिनेमाच्या माध्यामातून पाहता येणार आहे. सध्या विंडिज विरुद्ध सुरु असलेली टी 20 मालिकाही जिओ सिनेमावर दाखवण्यात येत आहे. जिओ सिनेमावर आयर्लंड विरुद्धची मालिका जिओ सिनेमावर दाखवण्यात येणार असल्याने क्रिकेट चाहत्यांना खिसा हलका करण्याची गरज नसणार आहे.
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, पहिला सामना, 18 ऑगस्ट.
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, दुसरा सामना, 20 ऑगस्ट.
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, तिसरा सामना, 23 ऑगस्ट.
जस्प्रीत बुमराह (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग , मुकेश कुमार आणि आवेश खान.
पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्रयू बालबर्नी, मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, थिओ व्हॅन वोरकॉम, बेन व्हाइट आणि क्रेग यंग.