IRE vs IND 2023 | आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया टी 20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर, कर्णधार कोण?

| Updated on: Jun 28, 2023 | 12:06 AM

Ireland vs Team India T20I Series | टीम इंडिया वेस्टइंडिज दौऱ्यानंतर तडक आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे.

IRE vs IND 2023 | आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया टी 20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर, कर्णधार कोण?
फाईल फोटो
Follow us on

डबलिन | आयसीसीने मंगळवारी 27 जून रोजी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. या वनडे वर्ल्ड कपची सुरुवात 5 ऑक्टोबरपासून होणार आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने असणार आहेत. तर टीम इंडिया या स्पर्धेतील आपला पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी खेळणार आहे. टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. टीम इंडियासाठी वर्ल्ड कप वेळापत्रकानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या विंडिज दौऱ्याची 12 जुलैपासून सुरुवात होणार आहे.

टीम इंडियाच्या विंडिज दौऱ्याची सांगता ही टी 20 मालिकेने होणार आहे. या मलिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना हा 13 ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर टीम आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात आयर्लंड विरुद्ध टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. एकूण 3 सामन्यांची ही मालिका असणार आहे. या टी 20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. या आयर्लंड दौऱ्यामुळे टीम इंडियात आयपीएलमधील स्टार खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळणार असल्याची तीव्र शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

टीम इंडियाचा आयर्लंड दौरा, आयसीसीचं ट्विट

आयर्लंड विरुद्धच्या या टी 20 मालिकेचं आयोजन हे 18 ते 23 ऑगस्ट दरम्यान करण्यात आलं आहे. या टी 20 मालिकेत हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात टीम इंडिया खेळेल. तर रिंकू सिंह, यशस्वी जयस्वाल आणि अन्य युवा खेळाडूंची पहिल्यांदाच निवड केली जाऊ शकते. टीम इंडियाची बी टीम आयर्लंड दौऱ्यावर जाण्याची अधिक शक्यता आहे.

आयर्लंड टीम इंडिया टी 20 मालिकेचं वेळापत्रक

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, पहिला सामना, 18 ऑगस्ट.

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, दुसरा सामना, 20 ऑगस्ट.

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, तिसरा सामना, 23 ऑगस्ट.

आयर्लंड विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी संभावित टीम इंडिया

हार्दिक पंड्या (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शुबमन गिल, यशस्वी जायसवाल, रिंकू सिंह, सूर्यकुमार यादव, साई सुदर्शन, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, शार्दुल ठाकुर, आकाश मधवाल, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार आणि तुषार देशपांडे.

दरम्यान टीम इंडिया 2022 मध्ये जून महिन्यात आयर्लंड दौरा केला होता. त्यावेळेस टीम इंडियाने आयर्लंडला 2 सामन्यांच्या टी 20 मालिकेत 2-0 अशा एकतर्फी फरकाने पराभव केला होता. त्यामुळे आता टीम इंडियाच्या युवासेनेकडून आयर्लंडवर अशाच पद्धतीने विजयाची अपेक्षा असणार आहे. या मालिकेसाठी येत्या काही दिवसात टीम इंडियाचं संघ जाहीर केला जाणार आहे.