पाकिस्तान क्रिकेट टीमने आयर्लंड विरुद्ध तिसऱ्या टी 20 सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. आयर्लंडने पाकिस्तानला विजयासाठी 179 धावांचं आव्हान दिलं होतं. पाकिस्तानने हे विजयी आव्हान 18 बॉल राखून आणि 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. पाकिस्तानने 17 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 181 धावा केल्या. पाकिस्तानचा हा या 3 सामन्यांच्या मालिकेतील सलग दुसरा विजय ठरला. पाकिस्तानने या विजयासह मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. तसेच आयर्लंडनेही पहिल्या सामन्यात विजयी सलामी देत पाकिस्तानला कडवं आव्हान दिलं होतं. मात्र अखेरीस पाकिस्तान यशस्वी ठरली आहे. आता उभयसंघ आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत आमनेसामने दिसणार आहेत.
पाकिस्तानकडून कॅप्टन बाबर आझम याने सर्वाधिक धावा केल्या. बाबरने 42 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 6 चौकारांच्या मदतीने 75 धावांची खेळी केली. मोहम्मद रिझवान याने अर्धशतक ठोकलं. रिझवाने 38 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 4 फोरसह 56 रन्स केल्या. सैम अय्युबने 11 बॉलमध्ये 14 रन्स केल्या. इफ्तिखार अहमद याने 5 धावांचं योगदान दिलं. तर विकेटकीपर आझम खान आणि इमाद वसीम या जोडीने पाकिस्तानला विजयापर्यंत पोहचवलं. आझम आणि इमाद ही जोडी नाबाद परतली आझमने 18 आणि आणि इमादने 1 धाव केली. आयर्लंडकडून मार्क एडेअर याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर क्रेग यंग याच्या खात्यात 1 विकेट गेली.
दरम्यान त्याआधी पाकिस्तान कॅप्टन बाबर आझम याने टॉस जिंकून आयर्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. आयर्लंडकडून कॅप्टन लॉर्कन टकर याने सर्वाधिक 73 धावांची खेळी केली. अँड्र्यू बालबिर्नी याने 35 धावा जोडल्या. तर हॅरी टेक्टर याने नाबाद 30 धावांचं योगदान दिलं. या तिघांनी केलेल्या खेळीच्या जोरावर आयर्लंडने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 178 धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहीन अफ्रिदी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. अब्बास अफ्रिदीने दोघांना आऊट केलं. तर अमिर आणि इमाद वसीम या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
पाकिस्तानचा मालिका विजय
Pakistan win the final T20I by six wickets ✅@babarazam258 and @iMRizwanPak boss the chase with a stellar batting display 👏#IREvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/Kcf6x09peF
— Pakistan Cricket (@TheRealPCB) May 14, 2024
आयर्लंड प्लेईंग ईलेव्हन : लॉर्कन टकर (कॅप्टन आणि विकेटकीपर), अँड्र्यू बालबिर्नी, रॉस एडेअर, हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, नील रॉक, मार्क एडेअर, ग्रॅहम ह्यूम, क्रेग यंग आणि बेंजामिन व्हाइट.
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन : बाबर आझम (कॅप्टन), सॅम अयुब, मोहम्मद रिझवान, फखर जमान, आझम खान (विकेटकीपर), इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, हसन अली, अब्बास आफ्रिदी आणि मोहम्मद अमीर.