IRE vs PAK : बाबर आझमचा धमाका, 5 बॉलमध्ये 4 सिक्स ठोकत विराटचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

| Updated on: May 15, 2024 | 12:39 AM

Babar Azam Break Virat Kohli World Record : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने आयर्लंड विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात विजयी खेळी साकारली. बाबरने यासह विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला.

IRE vs PAK : बाबर आझमचा धमाका, 5 बॉलमध्ये 4 सिक्स ठोकत विराटचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
babar azam pakistan
Follow us on

पाकिस्तान क्रिकेट टीमने आयर्लंडवर तिसऱ्या आणि अखेरच्या टी 20 सामन्यात 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला. पाकिस्तानने या विजयासह 3 सामन्यांची मालिकात 2-1 अशा फरकाने जिंकली. आयर्लंडने पाकिस्तानसमोर विजयासाठी 178 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पाकिस्तानने हे आव्हान 4 विकेट्स गमावून 3 ओव्हरआधी पूर्ण केल. पाकिस्तानने 17 ओव्हरमध्ये 4 विकेट्सच्या मोबदल्यात 181 धावा केल्या. कॅप्टन बाबर आझम हा पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार ठरला. बाबरने पाकिस्तानसाठी सर्वाधिक धावा केल्या. बाबरने 42 चेंडूत 5 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 75 धावांची खेळी केली. बाबरने या खेळीदरम्यान एक कीर्तीमान केला. बाबरने टीम इंडियाचा विराट कोहली याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला.

बाबरने आयर्लंड विरुद्ध आपल्या खेळीत एकूण 5 सिक्स ठोकले. बाबरने त्या 5 पैकी 4 सिक्स हे एकाच ओव्हरमध्ये लगावले. बाबरने हे 4 सिक्स बेंजामिन व्हाईट याच्या बॉलिंगवर ठोकले. बाबरने बेंजामिनच्या ओव्हमधील पहिल्या 3 चेंडूत सलग 3 सिक्स ठोकले. तर बाबरने त्यानंतर पाचव्या बॉलवर सिक्स खेचला. तसेच बाबरने अवघ्या 31 चेंडूत अर्धशतक झळकावलं. बाबरने या अर्धशतकासह विराट कोहलीचा विश्व विक्रम उध्वस्त केला. बाबरचं आयर्लंड विरुद्धचं अर्धशतक हे त्याच्या कारकीर्दीतील 39 वं अर्धशतक ठरलं. तर विराटने टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 38 अर्धशतकं लगावली आहेत.

दरम्यान आता टीम इंडिया आंतरराष्ट्रीय टी 20 सामने हे आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार आहे. साखळी फेरीत टीम इंडिया 4 सामने खेळणार असल्याचं निश्चित आहे. त्यामुळे आता विराटकडे 2 अर्धशतकं ठोकून बाबरला मागे टाकण्याची संधी आहे. अशात विराट पुन्हा एकदा वर्ल्ड रेकॉर्डवर आपलं नाव कोरण्यात यशस्वी ठरतो की बाबर आझम वर्ल्ड रेकॉर्ड कायम राखतो, याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

हे सुद्धा वाचा

आयर्लंड प्लेईंग ईलेव्हन : लॉर्कन टकर (कॅप्टन आणि विकेटकीपर), अँड्र्यू बालबिर्नी, रॉस एडेअर, हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, नील रॉक, मार्क एडेअर, ग्रॅहम ह्यूम, क्रेग यंग आणि बेंजामिन व्हाइट.

पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन : बाबर आझम (कॅप्टन), सॅम अयुब, मोहम्मद रिझवान, फखर जमान, आझम खान (विकेटकीपर), इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, हसन अली, अब्बास आफ्रिदी आणि मोहम्मद अमीर.