आगामी टी 20 वर्ल्ड कप 2-24 स्पर्धेला 2 जूनपासून सुरुवात होणार आहे. एकूण 20 संघांमध्ये एका ट्रॉफीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. त्याआधी वर्ल्ड कप स्पर्धेची रंगीत तालिम म्हणून काही संघ हे द्वि आणि त्रिपक्षीय मालिका खेळत आहेत. यापैकी त्रिपक्षीय टी 20 मालिकेतून मोठी बातमी समोर आली आहे. आयर्लंडने पाचव्या टी 20 सामन्यात स्कॉटलँडवर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. आयर्लंडच्या या विजयामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं आहे. आता आयर्लंडच्या विजयाचा पाकिस्तानशी काय संबंध हे जाणून घेऊयात.
एका बाजूला यूएसए विरुद्ध बांगलादेश यांच्यात 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यनात 21 मे रोजी यूएसएने बांगलादेशवर 5 विकेट्सने विजय मिळवला आणि 1-0 ने आघाडी घेतली. त्यानंतर आता नेदरलँड्स, आयर्लंड आणि स्कॉटलँड यांच्यीतील त्रिपक्षीय टी 20 मालिकेतून मोठी अपडेट समोर आली आहे. आयर्लंडने या मालिकेतील पाचव्या सामन्यात स्कॉटलँडवर मात करत दुसरा विजय मिळवला आहे. स्कॉटलँडने आयर्लंडसमोर 158 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आयर्लंडने 3 चेंडू शेष असताना 5 विकेट्स गमावून हे आव्हान पूर्ण केलं. अँड्रयू बालबर्नी आणि विकेटकीपर लॉर्कन टकर या दोघांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर आयर्लंडने सहज विजय मिळवला. अँड्य्रू याने 56 आणि लॉर्कनने 55 धावांची खेळी केली. आता या त्रिपक्षीय मालिकेतील अंतिम आणि सहावा टी 20 सामना हा 24 मे रोजी नेदरलँड्स विरुद्ध आयर्लंड यांच्यात होणार आहे.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सहभागी 20 संघांना 5-5 नुसार 4 गटात विभागण्यात आलं आहे. त्यानुसार टीम इंडिया, आयर्लंड, कॅनडा, यूएसए आणि पाकिस्तानचा समावेश आहे. यूएसएने 21 मे रोजी बांगलादेशला पराभूत करुन उलटफेर केला. तर आता आयर्लंडच्या 2 फलंदाजांनी अर्धशतक ठोकत स्कॉटलँडवर मात केली. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी एकाच गटात यूएसए आणि आयर्लंड दोन्ही संघांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. इतकंच नाही, तर पाकिस्तानलाही या दोन्ही संघांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे पाकिस्तानला या 2 संघांना हलक्यात घेणं योग्य ठरणार नाही.
विरुद्ध यूएसए, 6 जून, डॅलस.
विरुद्ध टीम इंडिया, 9 जून, न्यूयॉर्क.
विरुद्ध कॅनेडा, 11 जून, न्यूयॉर्क.
विरुद्ध आयर्लंड, 16 जून, फ्लोरिडा.
आयर्लंड प्लेईंग ईलेव्हन : पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेयर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग आणि बेंजामिन व्हाइट.
स्कॉटलंड प्लेईंग ईलेव्हन : रिची बेरिंग्टन (कर्णधार), जॉर्ज मुनसे, ऑली हेअर्स, मायकेल जोन्स, मॅथ्यू क्रॉस (विकेटकीपर), मायकेल लीस्क, मार्क वॅट, ख्रिस ग्रीव्हज, क्रिस्टोफर सोले, सफियान शरीफ आणि ब्रॅडली करी.