टीम इंडियाने झिंबाब्वेचा पाचव्या आणि अंतिम टी20i सामन्यात रविवारी 14 जुलै रोजी 42 धावांनी शानदार विजय मिळवला. टीम इंडियाने संजू सॅमसन याच्या 58 धावांच्य जोरावर 6 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 167 धावांपर्यंत मजल मारता आली. टीम इंडियाने झिंबाब्वेला विजयासाठी 168 धावांचं आव्हान दिलं. मात्र झिंबाब्वेला टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर पूर्ण ओव्हरही टीकून खेळता आलं नाही. झिंबाब्वेचा डाव 9 बॉलआधी आटोपला. झिंबाब्वे 18.3 ओव्हरमध्ये 125 रन्सववर ऑलआऊट झाली.
टीम इंडियाने दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत झिंबाब्वेवर 4-1 ने मालिका विजय मिळवला. शुबमन गिल याच्या नेतृत्वात टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात झिंबाब्वेकडून पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे टीम इंडिया 0-1 ने पिछाडीवर पडली होती. मात्र त्यानंतर टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडने कमाल केली. टीम इंडियाच्या युवासेनेने सलग 4 सामने जिंकत विजयी चौकार लगावला आणि मालिका विजय नोंदवला. यजमान झिंबाब्वेचा शेवटचा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न होता, मात्र त्यांना त्यात यश मिळालं नाही.
झिंबाब्वे आता टीम इंडिया विरुद्ध भिडल्यानंतर आयर्लंड दौरा करणार आहे. झिंबाब्वे या दौऱ्यात आयर्लंड विरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. झिंबाब्वे क्रिकेट बोर्डाने या कसोटी सामन्यासाठी 12 जुलै रोजी टीम जाहीर केली. क्रिकेट बोर्डाने 15 सदस्यीय संघाची सोशल मीडियावरुन घोषणा केली. त्यानुसार क्रेग एर्विन हा झिंबाब्वेचं नेतृत्व करणार आहे. तसेच निवड समितीने या एकमेव सामन्यासाठी 4 युवा खेळाडूंचा पहिल्यांदाच संधी दिली आहे. यामध्ये क्लाइव्ह क्लाइव्ह मदांडे, जॉयलॉर्ड गुम्बी, ब्रायन बेनेट आणि जॉनथन कॅम्पबेल या चौघांचा समावेश केला गेला आहे. या एकमेव सामन्याचं आयोजन 25 ते 29 जुलैदरम्यान सिव्हील सर्व्हिस क्रिकेट क्लब, बेलफास्ट येथे करण्यात आलं आहे.
एकमेव कसोटीसाठी अशी आहे झिंबाब्वे टीम
Zimbabwe announced the squad for their first meeting against Ireland in Test cricket 👊
More 👉 https://t.co/MWXYkHv6hM#IREvZIM pic.twitter.com/7CXOvbN7TC
— ICC (@ICC) July 12, 2024
एकमेव कसोटी सामन्यासाठी झिंबाब्वे टीम: क्रेग एर्विन (कर्णधार), ब्रायन बेनेट, जोनाथन कॅम्पबेल, तेंडाई चतारा, तनाका चिवांगा, जॉयलॉर्ड गुम्बी, रॉय काईया, क्लाइव्ह मदांडे, वेलिंग्टन मसाकादझा, प्रिन्स मासवारे, ब्लेसिंग मुझाराबानी, डिओन मायर्स, रिचर्ड एनगारावा, व्हिक्टर न्याउची आणि सीन विल्यम्स.