Cricket : एकमेव कसोटी-2 मालिका आणि 6 सामने, संघाची घोषणा, कॅप्टन कोण?

| Updated on: Jan 03, 2025 | 10:45 PM

Only Test Odi and T20i Series : निवड समितीने एकमेव कसोटीसह एकदिवसीय आणि टी 20i मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. पाहा वेळापत्रक आणि संघ.

Cricket : एकमेव कसोटी-2 मालिका आणि 6 सामने, संघाची घोषणा, कॅप्टन कोण?
india vs Ireland t20i match
Image Credit source: Bcci
Follow us on

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आयर्लंड क्रिकेट टीमने झिंबाब्वे दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली आहे. आयर्लंड टीम झिंबाब्वे दौऱ्यात एकमेव कसोटी, एकदिवसीय आणि टी 20i मालिका खेळणार आहेत. उभयसंघात एकदिवसीय आणि टी 20i मालिकेत प्रत्येकी 3-3 सामने खेळवण्यात येणार आहे. आयर्लंडच्या झिंबाब्वे दौऱ्याची सुरुवात दौऱ्याची सुरुवात 6 फेब्रुवारीपासून एकमेव कसोटीने होणार आहे. तर 25 फेब्रुवारीला तिसऱ्या टी 20i सामन्याने दौऱ्यांची सांगता होईल. आयर्लंड निवड समितीने या एकमेव कसोटी आणि दोन्ही मालिकांसाठी संघ जाहीर केला आहे. सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

अँड्र्यू बालबर्नी हा एकमेव कसोटी सामन्यात आयर्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर अनुभवी पॉर्ल स्टर्लिंग हा वनडे आणि टी 20i सीरिजमध्ये आयर्लंडचं नेतृत्व करणार आहे.

झिंबाब्वे दौऱ्यासाठी आयर्लंड संघ जाहीर

झिंबाब्वेविरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी आयर्लंड संघ: अँड्र्यू बालबर्नी (कॅप्टन), मार्क एडेअर, कर्टिस कॅम्फर, गेविन होई, ग्रॅहम ह्यूम, मॅथ्यू हम्फ्रेस, अँड्र्यू मॅकब्राईन, बॅरी मॅककार्थी, पीजे मूर, पॉल स्टर्लिंग, हॅरी टेक्टर, मॉर्गन टॉपिंग, लॉर्कन टकर आणि क्रेग यंग.

झिंबाब्वेविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी आयर्लंड संघ: पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), मार्क एडेअर, अँड्र्यू बालबर्नी, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गेविन होई, ग्रॅहम ह्यूम, मॅथ्यू हम्फ्रेज, जोश लिटल, अँड्र्यू मॅकब्राईन, बॅरी मॅकार्थी, हॅरी टेक्टर, मॉर्गन टॉपिंग, लॉर्कन टकर आणि क्रेग यंग.

झिंबाब्वेविरूद्धच्या टी 20i सीरिजसाठी आयर्लंड टीम : पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलनी, जॉर्ज डॉकरेल, ग्रॅहम ह्यूम, मॅथ्यू हम्फ्रेस, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, नील रॉक, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर आणि बेन व्हाइट.