मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड 2023 ची उत्सुकता दिवसेंदिवस शिगेला पोहचत आहे. स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश,अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि नेदरलँडचा समावेश आहे. या 10 पैकी 7 टीमची वर्ल्ड कपसाठी घोषणा करण्यात आलीय.तर 3 संघांनी टीम जाहीर केलेली नाही. यामध्ये पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. त्यामुळे हे तिन्ही संघांची घोषणा केव्हा होतेय, याकडेही लक्ष लागून आहे. तर दुसऱ्या बाजूला भारतात तब्बल 12 वर्षानंतर आयसीसी वनडे वर्ल्ड कपचं आयोजन करण्याच आलंय. भारतात वर्ल्ड कप होत असल्याने टीम इंडिया प्रबळ दावेदार समजली जात आहे. वर्ल्ड कपआधी सर्वच सहभागी संघ सराव सामने खेळणार आहेत.
वर्ल्ड कपची लगबग सुरु असताना एका स्टार क्रिकेटरने निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. आयर्लंड टीमचा माजी वेगवान गोलंदाज टीम मुर्तघ याने निवृत्त होणार असल्याचा निर्णय घेतलाय. मुर्तघ 23 वर्षांपासून काउंटी क्रिकेटचा एक भाग आहे. मुर्तघ क्रिकेट कारकीर्दीतील अखेरचा सामना हा नॉटिंगघमशायर विरुद्ध खेळणार आहे. हा सामना ट्रेंट ब्रिज इथे पार पडणार आहे. मुर्तघचा मिडलसेक्स टीममध्ये वार्विकशायर विरुद्धच्या सामन्यासठी स्थान देण्यात आलंय. हा सामना या आठवड्यात होणार आहे.
मुर्तघ याचा वार्विकशायर विरुद्धच्या सामन्यात समावेश केल्यास त्याच्या कारकीर्दीतील हा 264 वा फर्स्ट क्लास सामना ठरेल. मुर्तघने आपल्या कारकीर्दीत 1 हजारपेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
“25 वर्षांच्या अविश्वसनीय कारकीर्दीनंतर अखेर थांबवण्याची वेळ आली आहे. या हंगामानंतर मी क्रिकेटमधून निवृत्त असल्याची घोषणा करतोय. एका कल्बसाठी 2007 पासून खेळणं ही माझ्यसाठी अभिमानाची बाब आहे. मी सर्वांचाच आभारी आहे”, असं मुर्तघ म्हणाला.
टीम मुर्तघ याने आपल्या कारकीर्दीत एकूण 1 हजार 341 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच टीम मुर्तघने आयर्लंडचं 3 कसोटी, 58 वनडे आणि 14 टी 20 सामन्यात प्रतिनिधित्व केलंय. मुर्तघने या दरम्यान 100 विकेट्स घेतल्या.