मुंबई : भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया तिसऱ्या विजयासाठी उत्सुक होती. पण तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने जबरदस्त कमबॅक केलं. भारतीय गोलंदाजांना धु धु धुतलं आणि विजय मिळवला. या सामन्यात विकेटकीपर इशान किशनची स्टम्पिंगसाठी केलेली अपील भोवली असंच म्हणावं लागेल. कारण त्या चेंडूवर स्टम्पिंग तर मिळाला नाही. उलट नो बॉल दिल्याने पुढच्या चेंडूवर फ्री हिट मिळाला. त्या चेंडूवर मॅथ्यू वेडने उत्तुंग षटकार मारत ऑस्ट्रेलियाचा विजय धावांनी जवळ आणला. ऑस्ट्रेलियाला 12 चेंडूत 43 धावांची आवश्यकता होती. त्यामुळे कर्णधार सूर्यकुमार यादव याने 19 वं षटक अक्षर पटेल याच्याकडे सोपवलं. हे षटक शेवटच्या सहा चेंडूवर सर्वात प्रभाव टाकणारं असल्याने सूर्यकुमार यादवने तसा निर्णय घेतला. अनुभवी अक्षर पटेल शेवटच्या षटकात मोठी धावसंख्या ठेवेल असा प्लान होता. पण या षटकात भलतंच घडलं आणि शेवटच्या 6 चेंडूत 23 धावा असा सामना आला.
अक्षर पटेलच्या पहिल्याच चेंडूवर वेडने चौकार ठोकला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर दोन धावा काढला. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा चौकार आला. त्यामुळे अक्षर पटेल याच्यावर दबाव आला. चौथा चेंडू टाकताना वाइड पडला आणि मोठी चूक घडली. मुख्य पंचांनी वाइड असल्याचं घोषित केलं. तर इशान किशनने चेंडू पकडला आणि स्टम्पिंग केलं. यासाठी त्याने स्क्वेअर लेगला असलेल्या पंचांकडे अपील केलं आणि तिसऱ्या तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली.
तिसऱ्या पंचांनी सर्वच बाबी तपासण्यास सुरुवात केली. सर्वात आधी चेंडू बॅटला लागला की नाही याची चाचपणी झाली. त्यात नाबाद असल्याचं लक्षात आल्यावर स्टम्पिंगच्या अपीलाकडे मोर्चा वळवला. पण इशान किशनने नेमकी इथेच चूक केली होती. चेंडू पकडताना स्टम्पच्या थोड्या आधी पकडला होता. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी नो बॉल असल्याचा निर्णय दिला. यामुळे अक्षर पटेलचा चेहराच पडला. कारण दुसऱ्या चेंडूवर काय होईल याची कल्पना अक्षर पटेलला होती. मग काय दुसऱ्या चेंडूवर उत्तुंग षटकार मारला.
Looks like Ishan Kishan is playing for Australia.#INDvsAUS pic.twitter.com/xm41rIGPpV
— 𝐒 𝐰 𝐚 𝐫 𝐚 ⎋ (@SwaraMSDian) November 28, 2023
एमसीसी नियम 27.3.1 नुसार, विकेटकीपर स्ट्रायकर एंडवर पूर्णपणे स्टम्पच्या मागे उभा राहील. फलंदाजाच्या बॅटला चेंडू लागत नाही किंवा स्टम्प पार करत नाही तोपर्यंत तो चेंडू पकडायचा नाही. 27.3.2 नुसार, विकेटकीपरने वरच्या नियमाचं उल्लंघन केलं तर पंच तो चेंडू नो असल्याचं जाहीर करेल.
ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-1 ने कमबॅक केलं आहे. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 3 गडी गमवून 223 धावा विजयासाठी दिल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 5 गडी गमवून शेवटच्या चेंडूवर पूर्ण केलं. ग्लेन मॅक्सवेलने 48 चेंडूत नाबाद 104 धावा केल्या. यात 8 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश आहे.