Video : अर्जुन अस्त्रासमोर इशान किशनची बोलती बंद! खाली पडला आणि…

| Updated on: Mar 12, 2024 | 6:23 PM

आयपीएल स्पर्धेचा ज्वर आता हळूहळू चढू लागला आहे. खेळाडूंचा गोतावळा आता एका ठिकाणी जमू लागला आहे. तसेच स्पर्धेपूर्वीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. आहेत त्या सर्व अस्त्र शस्त्रांना धार चढवली जात आहे. असंच मुंबईच्या ताफ्यातल्या अर्जुनास्त्र तापून सुलाखून निघाल्याचं दिसत आहे. त्याची अनुभूती इशान किशनला आली.

Video : अर्जुन अस्त्रासमोर इशान किशनची बोलती बंद! खाली पडला आणि...
Video : अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीला चढली धार, इशान किशनला जागेतच केलं चीतपट
Follow us on

मुंबई : आयपीएल स्पर्धेत खऱ्या अर्थाने नवोदित खेळाडूंचा जोर दिसून येतो. आपल्या क्षमतेने नवोदित खेळाडू सामन्याचं रुपडं पालटण्याची क्षमता ठेवतात. यातूनच राष्ट्रीय टीमसाठी खेळाडूंची निवड करण्यास सोपं जातं. जवळपास दोन महिने चालण्याऱ्या क्रिकेट कुंभात अनेक खेळाडू आपलं कौशल्य दाखवण्यास सज्ज आहेत. यात मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील अर्जुन अस्त्राचाही समावेश आहे. त्याच्या गोलंदाजीला गेल्या काही दिवसात धार चढल्याचं दिसत आहे. याची प्रचिती गेल्या काही दिवसांपासून आयपीएलसाठी तयारी करत असलेल्या इशान किशनला आली. इशान किशन नेटमध्ये प्रॅक्टिस करत असताना समोर अर्जुन तेंडुलकर गोलंदाजी करत होता. इशानला नेहमीप्रमाणे वाटलं, पण त्याच्या गोलंदाजीला चढलेली धार पाहून तोही आवाक् झाला आहे. अर्जुन तेंडुलकर 2021 पासून मुंबई इंडियन्ससोबत आहे. पण मागच्या पर्वात त्याला पहिल्यांदा संधी मिळाली. पण त्याला हवा तसा प्रभाव टाकता आला नाही. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 24 मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध आहे.

आयपीएल 2024 स्पर्धेत अर्जुन तेंडुलकर आपला प्रभाव टाकण्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहे. गोलंदाजीला आणखी धार चढवून मैदानात उतरणार आहे. याचंच उदाहरण त्याने नेट प्रॅक्टिसमध्ये दाखवून दिलं. इशान किशन बॅटिंग करत होता. यावेळी अर्जुन तेंडुलकरने यॉर्कर टाकला. हा यॉर्कर इतका परफेक्ट होता की त्याला काही कळलंच. चेंडूवर जाताना जमीनवर पडला. इतकंच काय तर हातून बॅटही सुटली. दुसरा चेंडूही असाच काहीसा टाकला.

आयपीएलमध्ये मागच्या पर्वात अर्जुन तेंडुलकरने पदार्पण केलं होतं. यात त्याला 4 सामने खेळण्याची संधी मिळाली. त्यात त्याने 3 गडी बाद केले. मागच्या पर्वात त्याच्या वेगावरून बरीच टीका झाली होती. मात्र यावेळी त्यात त्याने सुधारणा केल्याचं दिसून आलं आहे.

दुसरीकडे, इशान किशनच्या कामगिरीकडेही लक्ष असणार आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यातून माघारी आल्यानंतर क्रिकेटच्या मैदानात दिसला नाही. बीसीसीआयने रणजी ट्रॉफी खेळण्याची सूचना केली होती. मात्र त्याकडेही कानाडोळा केला. आता आयपीएलमधील कामगिरीवर त्याचं भवितव्य ठरणार आहे.