विशाखापट्टणम | ईशान किशन याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 मालिकेतील पहिल्याच टी 20 सामन्यात धमाका केला आह. ईशानने 209 धावांच्या विजयी आव्हानाचं पाठलाग करताना तडाखेदार खेळी करत झंझावाती अर्धशतक ठोकलं आहे. ईशानने अवघ्या 37 बॉलमध्ये अर्धशतक केलं. ईशानच्या टी 20 कारकीर्दीतील हे पाचवं अर्धशतक ठरलं. इशानने या खेळीदरम्यान तोडफोड बॅटिंग केली.
यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड ही सलामी जोडी विजयी आव्हानाचं पाठलाग करायला मैदानात आली. मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये यशस्वी जयस्वाल याच्या चुकीमुळे ऋतुराज गायकवाड एकही बॉल न खेळता रनआऊट झाला. त्यानंतर ईशान किशन मैदानात आला. 11 धावांनंतर टीम इंडियाला दुसरा झटका लागला. यशस्वी जयस्वाल 21 धावा करुन आऊट झाला. त्यामुळे टीम इंडियाची 2 बाद 22 अशी स्थिती झाली.
यशस्वीनंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव मैदानात आला. सूर्या आणि ईशान या दोघांनी टॉप गिअरमध्ये बॅटिंग करत ऑस्ट्रेलियाला झोडपला. ईशान किशनने जोरदार फटकेबाजी केली. ईशानने फक्त 37 बॉलमध्ये अर्धशतक केलं. मात्र त्यानंतर 2 बॉल खेळून ईशान आऊट झाला. ईशानने 39 बॉलमध्ये 2 चौकार आणि 5 सिक्सच्या मदतीने 58 धावांची खेळी केली. ईशान आणि सूर्याने अशाप्रकारे तिसऱ्या विकेटसाठी 112 धावांची विक्रमी भागीदारी केली.
ईशान आऊट झाल्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव याने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली. सूर्याने ईशान आऊट झाल्यानंतरही तडाखा कायम ठेवला. अशाप्रकारे सूर्यानेही 29 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. सूर्याच्या टी 20 कारकीर्दीतील 16 वं अर्धशतक ठरलं.
सूर्यकुमार यादव याचं कर्णधार म्हणून पहिलं टी 20 अर्धशतक
Leading from the front & how! 👌 👌
Suryakumar Yadav notches up a cracking FIFTY on his captaincy debut! 👏 👏#Teamindia 144/3 after 14 overs in the chase.
Follow the match ▶️ https://t.co/T64UnGxiJU#TeamIndia | #INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/cy1hSwWWOY
— BCCI (@BCCI) November 23, 2023
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | मॅथ्यू वेड (कॅप्टन आणि विकेटकीपर), मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ, जोश इंग्लिस, अॅरॉन हार्डी, मार्कस स्टॉयनिस, टिम डेव्हिड, शॉन एबॉट, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ आणि तनवीर संघा.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन | ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार आणि प्रसीध कृष्णा.