मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल 2023 सामन्याआधी टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला एक प्रश्नाची डोकेदुखी झाली असणार आहे. आता संघाची घोषणा झाल्यावर नेमकी कोणती गोष्ट आहे, ज्यामुळे मॅनेजमेंट विचारात पडली आहे. दुसरं तिसरं काही नाहीतर ऋषभ पंत नसल्याने त्याच्या जागेवर संघात आता इशान किशन आणि केएस भरत हे दोन पर्याय आहेत. मात्र यातील कोणाला प्लेइंग 11 मध्ये स्थान द्यायचं हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. अशातच यावर भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने त्याचं मत सांगितलं आहे.
हरभजन सिंगच्या मते, फायनल सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये इशान किशन याला घेण्यात यावं, असं म्हटलं आहे. हरभजन सिंगनेही इशान किशनची निवड करण्यामागचे कारण सांगितले आहे. भज्जीच्या मते, किशनला भरतपेक्षा नवीन चेंडू खेळण्याचा अनुभव जास्त आहे. तो ओपनर असल्याने असून नवीन चेंडू अधिक चांगल्या प्रकारे खेळतो. जर किशन 80 षटकांनंतर फलंदाजीला आला तर तो दुसऱ्या नवीन चेंडूचाही सामना करताना अडचण येणार नाही.
ऋषभ पंत मोठा खेळाडू आहे, त्याच्यासारखी खेळण्याची क्षमता इशान किशनमध्ये आहे. केएस भरत विकेटकीपर म्हणून बेस्ट आहे मात्र त्याच्या फलंदाजीमध्ये फायनल सामन्यात आत्मविश्वास दिसणार नाही, असं भज्जीने म्हटलं आहे.
दरम्यान, जर आकडेवारी पाहिली तर पंतच्या अनुपस्थितीमध्ये टीम इंडियाने केएस भरतला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत संधी मिळाली होती. मात्र चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भरतला केवळ 20 च्या सरासरीने धावा काढता आल्या. त्यामुळे त्याच्या संघातील स्थानावर धावांच्या अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते.