राहुलच्या जागी ‘या’ खेळाडूची टीम इंडियातं एन्ट्री, युवा खेळाडूला लागणार लॉटरी?

| Updated on: Sep 01, 2023 | 11:58 PM

इंडिया आणि पाकिस्तान या सामन्यामध्ये केएल राहुलच्या गैरहजेरीत एका युवा खेळाडूची संघात एन्ट्री होणार आहे.

राहुलच्या जागी या खेळाडूची टीम इंडियातं एन्ट्री, युवा खेळाडूला लागणार लॉटरी?
आपल्या मांडीच्या शस्त्रक्रियेनंतर राहुल शस्त्रक्रियेनंतर बंगळुरू मधील एनसीए मध्ये तो ट्रेनिंग घेत आहे. आता तो बरा झाला असून केव्हाही संघात परतू शकतो. त्यामुळे संघासाठी चांगली बातमी म्हणावी लागेल.
Follow us on

Asia Cup 2023 : आशिया कप 2023 या स्पर्धेतील 2 सामने पार पडले आहेत. इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला सुरु होण्यासाठी अगदी काही तासांचाचं कालावधी शिल्लक आहे.काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविड याने प्रेस कॉन्फरन्स मध्ये इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज केएल राहुल आशिया कपच्या पहिल्या दोन सामन्यांत खेळू शकणार नाही अशी माहिती दिली होती. त्यामुळे केएल राहुलच्या जागी संघात कोणाला स्थान मिळणार? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं.अशातचं आता हा खेळाडू राहुलच्या गैरहजेरीत पहिले दोन सामने खेळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नेमका कोण आहे तो खेळाडू?

आशिया कपमधील पहिल्या दोन सामन्यांतून केएल राहुल दुखापतीमुळे बाहेर गेल्याने टीम इंडियाची आशिया कपसाठीची डोकेदुखी चांगलीचं वाढली आहे.पण आता पहिल्या दोन सामन्यातं टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज इशान किशनला संघात स्थान मिळणार असल्याची पुसट शक्यता वर्तवली जात आहे.पण तो कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला येणार याबद्दल अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित आहे.

वन-डे सामन्यात आतापर्यंत अशी कामगिरी:-

इशान किशनने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय वन-डे सामन्यात संघासाठी चांगली कामगिरी बजावली आहे. इशान किशनने 2022 साली खेळल्या गेलेल्या बांग्लादेश विरुद्धच्या वन-डे सामन्यात ताबडतोड फलंदाजी करतं डबल सेंचुरी ठोकली होती. ही डबल सेंचुरी आतापर्यंतरच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील फास्टेस्ट डबल सेंचुरी ठरली. इशानने आतापर्यंतच्या अनेक सामन्यांमध्ये आपल्या ताबडतोड फलंदाजीने संघासाठी चांगले प्रदर्शन केलं आहे. तसेचं आपल्या विकेटकीपिंगच्या स्किल्सनेही इशानने अनेकांना प्रभावित केलं आहे.

त्यामुळे केएल राहुलच्या गैरहजेरीत पहिल्या दोन सामन्यातं संघात इशान किशनला नक्कीचं स्थान मिळणार आहे अशी माहिती मीडिया रिपोर्ट्सनुसार मिळाली आहे.पण तो कोणत्या क्रमांकावर बॅटिंग करणार याबद्दल अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित आहे.