दक्षिण अफ्रिका दौरा अर्धवट सोडून आल्यापासून इशान किशन टीम इंडियात कमबॅकसाठी धडपड करत आहे. पण त्याला संघात स्थान मिळवण्यासाठी बरीच स्पर्धा करावी लागणार आहे. कारण संघात ऋषभ पंत, केएल राहुल यांच्यासारखे विकेटकीपर फलंदाज आहेत. त्यामुळे त्याला आता कामगिरीतूनच काय ते सिद्ध करून दाखवावं लागणार आहे. पण दुखापतीमुळे इशान किशन पहिल्या टप्प्यातील सामन्यांना मुकला. पण दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या टप्प्यात त्याची अचानक इंडिया सी संघात एन्ट्री झाली. त्याने पहिल्या सामन्यात 126 चेंडूत 111 धावांची खेळी केली. इशान किशन इतक्यावरच थांबला नाही. तर दुसऱ्या दिवशी त्याने गोलंदाजीही केली. इशान किशनने एक षटक टाकलं. त्यामुळे इशान किशनची टीम इंडियात पुनरागमनासाठी धडपड असल्याचं दिसून येत आहे.
इशान किशनने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सहाव्यांदा गोलंदाजी केली. यापूर्वी त्याने 2018 मध्ये रणजी स्पर्धेत झारखंडकडू खेळताना उत्तर प्रदेशविरुद्ध चार षटकं टाकली होती. त्यानंतर 2022 मध्ये रणजी ट्रॉफी सीजनमध्ये सर्व्हिसेजकडून खेळताना एक षटक टाकलं होतं. आता हे त्याच्या फर्स्ट क्रिकेट कारकिर्दितलं सहावं षटक होतं. इंडिया बी संघ फलंदाजीसाठी उतरला तेव्हा 73वं षटक टाकण्याची जबाबदारी इशान किशनने घेतली. त्यावेळेस मैदानात अभिमन्यू ईश्वरन आणि वॉशिंग्टन सुंदर फलंदाजी करत होते. या षटकात विकेट तर मिळाली नाही, पण 7 धावा मिळाल्या.
The Bowler Ishan Kishan in the town you all 😎🔥@ishankishan51 #IshanKishan #BuchiBabuTournament pic.twitter.com/AvgkAfDibE
— Ishan’s💙🧘♀️ (@IshanWK32) August 22, 2024
इशान किशनला 2024 वर्षात एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. बीसीसीआयच्या दणक्यानंतर पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटकडे मोर्चा वळवला आहे. दुलीप ट्रॉफीआधी चेन्नईत रंगलेल्या बुची बाबू स्पर्धेतही इशान किशनने गोलंदाजी केली होती. दरम्यान, इंडिया बी आणि इंडिया सी यांच्यातील सामना ड्रॉकडे झुकला आहे. या सामन्याचा चौथा शेवटचा दिवस शिल्लक आहे. तीन दिवसांचा खेळ संपला असून अजूनही पहिल्या डावाचा खेळ संपलेला नाही. दुसरीकडे श्रेयस अय्यरही इंडिया डी संघाकडून गोलंदाजी करताना दिसला. तसेच सहा वर्षानंतर एक विकेट घेण्यात त्याला यश मिळालं.