मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने गेली अनेक वर्षे क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली आहे. अनेक विक्रमांना त्याने गवसणी घातली आहे. काही विक्रम तर भविष्यातही मोडणं अशक्य आहे. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण क्रिकेटवरील त्याचं प्रेम कायम आहे. क्रिकेटच्या मैदानात उतरण्याची जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा सचिन तिथे आपसूक उभा असतो. क्रिकेटचं मैदान आणि त्याचं एक वेगळं नातं आहे. तसेच प्रतिभावंत खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात तो कोणतीच कसर सोडत नाही. काश्मीरचा दिव्यांग क्रिकेटपटू आमिर हुसैन यालाही प्रोत्साहन दिलं. काश्मीरमध्ये जाऊन त्याची भेट घेतली. इतकंच काय तर एका खास सामन्यासाठी आमीरला त्याने मुंबईत बोलवलं. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात बॉलिवूड आणि क्रिकेटमधील दिग्गज आमनेसामने आले.
सामना सुरु होण्यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने आमिर हुसैनला मैदानात बोलवलं. इतकंच काय तर आमिरला 10 नंबरची जर्सी तर दिली. त्याचबरोबर त्याची जर्सी परिधान करून मैदानात उतरला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची ही कृती पाहून आमिर देखील भावुक झाला.
An extraordinary moment for Amir, celebrated by the Master Blaster for his unwavering love and dedication to cricket 🫶
We're kicking off the @ispl_t10 with a flourish 💥#SonySportsNetwork #ispl #isplt10 #Street2Stadium #ZindagiBadalLo pic.twitter.com/gH93tpZnVe
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) March 6, 2024
सामन्यात आमीर गोलंदाजीसाठी आला तेव्हा त्याने पायाने गोलंदाजी केली. क्रीजवर बिग बॉस विनर फारुकी गोलंदाजी करत होता. यावेळी सचिन तेंडुलकरने विकेटकीपिंगची जबाबदारी सांभाळली आणि त्याचं मनोबळ वाढवलं. तर फलंदाजीसाठी आमिरला आपला ओपनिंग पार्टनरही बनवला. या डावात सचिन तेंडुलकर 17 चेंडूत 30 धावा करून बाद झाला. बिग बॉस 17 चा विजेता मुनावर फारुकीने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची विकेट घेतली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Amir doesn't just inspire, he defines inspiration 🤩#SonySportsNetwork #ISPL #ISPLT10 #Street2Stadium #ZindagiBadalLo | @ispl_t10 pic.twitter.com/eW33Or89pA
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) March 7, 2024
Our champ @munawar0018 consistent brilliance shines through as he claims the wicket of cricket icon #SachinTendulkar proving his unwavering talent on any stage.
MUNAWAR FARUQUI PLAYING ISPL#MunawarFaruqui || #MKJW || #MKJW𓃵#MunawarKiJanta || #MunawarWarriors pic.twitter.com/oJpkII6KLa
— ᴛᴇᴀᴍ ᴍᴜɴᴀᴡᴀʀ ғᴀʀᴜǫᴜɪ ᵀᴹ (@ItsMunawarFC) March 6, 2024
काश्मीर दौऱ्यात सचिन तेंडुलकरने आमीरची भेट घेतली होती. तसेच त्याला आपली सही असलेली बॅट गिफ्ट दिली होती. आमिरचा आत्मविश्वास पाहून प्रेरणा मिळाल्याचं यावेळी सचिन तेंडुलकरने सांगितलं होतं. दरम्यान, या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होत आहेत. ही लीग 10-10 षटकांची असणार आहे. यामध्ये टेनिस बॉलने सामने खेळवले जातील. माझी मुंबई अमिताभ बच्चन, श्रीनगरचा वीर अक्षय कुमार, बंगळुरू स्ट्रायकर्स हृतिक रोशन, न्नई सिंघम्सचा सूर्या, फाल्कन रायझर्स हैदराबाद राम चरण आहे आणि टायगर्स ऑफ कोलकाताचा मालक सैफ आणि करीना आहे.