ठाणे | आयएसपीएल अर्थात इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग स्पर्धेला 6 मार्चपासून सुरुवात झाली. या स्पर्धेत एकूण 6 संघ एका ट्रॉफीसाठी भिडणार आहेत. टेनिस क्रिकेटमधील अनेक खेळाडूंना या स्पर्धेच्या माध्यमातून आपली छाप सोडण्याचं हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. या स्पर्धेतील पहिला सामना हा माझी मुंबई विरुद्ध श्रीनगर के वीर यांच्यात पार पडला. या क्रिकेट सामन्याचं आयोजन हे ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये करण्यात आलं. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात माझी मुंबईचा कॅप्टन योगेश पेणकर यांना झंझावाती अर्धशतकी खेळी केली.
या 10 षटकांच्या सामन्यात श्रीनगर के वीर टीमने टॉस जिंकला. कॅप्टन ओमकार देसाई याने फिल्डिंगचा निर्णय घेत माझी मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईची सुरुवात निराशाजनक झाली. रवीराज अहिरे पहिल्याच बॉलवर आऊट झाला. रवीराजनंतर कॅप्टन योगेश पेणकर मैदानात आला. योगशने आतापर्यंत टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या झंझावाती खेळीने छाप सोडली होती. योगशच्या तडाखेदार खेळीबाबत अनेक जण ऐकून होते. मात्र या आयएसपीएलमुळे अनेक क्रिकेट चाहत्यांना योगेशचा झंझावात पाहायला मिळाला. मुंबई एका बाजूला विकेट गमावत होती. तर दुसऱ्या बाजूने योगेशने टॉप गिअरमध्ये बॅटिंग करत या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात अफलातून सुरुवात केली.
योगेशने विस्फोटक अर्धशतकी खेळी करत आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी केली. योगेश आयएसपीएल स्पर्धेत अर्धशतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला. योगशने डावातील 10 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर राजेश सोरटे याच्या बॉलिंगवर खणखणीत सिक्स खेचून अर्धशतक पूर्ण केलं. योगशने 23 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 2 चौकारांच्या मदतीने हे अर्धशतक झळकावलं. योगशने श्रीनगर विरुद्ध 26 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 4 चौकारांच्या मदतीने एकूण 61 धावांची खेळी केली.
योगेश पेणकर याचा अर्धशतकी धमाका
माझी मुंबई प्लेईंग ईलेव्हन | योगेश पेणकर (कॅप्टन) अझाज कुरेशी, रवी गुप्ता, रवीराज अहिरे, अभिषेक कुमार दालहोर, देविड गोगोई, बशरत हुसैन वाणी, सईद सलमान, अश्रफ खान, कृष्णा पवार आणि विजय पावले.
श्रीनगर के वीर प्लेईंग ईलेव्हन | ओमकार देसाई, नवनीत परिहार, लोकेश, मोहम्मद नदीम, दीपक डोगरा, अहमद अस्करी, ऐशवर्य सुर्वे, भूषण गोळे, प्रितम बारी, राजेश सोरटे आणि रोहित यादव.