मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत श्रीलंकेची सर्वात सुमार कामगिरी राहिली आहे. चॅम्पियन ट्रॉफी 2025 साठीही संघ पात्र होऊ शकला नाही. त्यामुळे श्रीलंकन क्रिकेट बोर्डाविरुद्ध संतापाची लाट उठली आहे. क्रीडामंत्र्यांनी संपूर्ण क्रिकेट बोर्डच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. तसेच आयसीसीकडे पत्र पाठवून कारवाईची मागणी केली होती. मात्र बोर्डाने सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळवला. पण आयसीसीने श्रीलंकन क्रिकेट बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. आता इतक्या सर्व घडामोडी घडत असताना श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयवर गंभीर आरोप लावला आहे. श्रीलंकेच्या डेली मिरर न्यूज पेपरच्या युट्यूब चॅनेलवर एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाचे सदस्यांच्या घनिष्ठ संबंधांमुळेच वाताहत झाल्याचं सांगितलं आहे.
अर्जुन रणतुंगा याने सांगितलं की, ‘जय शाह श्रीलंकन क्रिकेट चालवत आहे. जय शाहच्या दबावामुळेत श्रीलंकन क्रिकेट बोर्डाची वाताहत होत आहे. भारतातील एक व्यक्ती श्रीलंक क्रिकेटची वाट लावत आहे. ते पण फक्त वडील शक्तिशाली असल्याने. ते भारताचे गृहमंत्री आहेत.’
‘श्रीलंकन क्रिकेट बोर्डाचे सदस्य आणि जय शाह यांच्यातील संबंधांमळेच ते या भ्रमात आहेत की, आम्ही श्रीलंक क्रिकेट बोर्डावर नियंत्रण मिळवू शकतो.’, असा गंभीर आरोपही अर्जुन रणतुंगा यांनी पुढे केला. क्रीडामंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर अर्जुन रणतुंगा यांच्या अध्यक्षतेखाली एक अंतरिम समितीचं गठण करण्यात आलं आहे.
दुसरीकडे, क्रिकेटमुळे श्रीलंकेच्या राजकारणातही खळबळ उडाली आहे. घडामोडीनंतर क्रीडामंत्री रोशन रणसिंघे राजीनामा देण्याची किंवा त्यांना पदावरून दूर करण्याची शक्यता आहे. रोशन रणसिंघे यांनी यापूर्वी स्पष्ट केलं आहे की, राष्ट्रपती विक्रमसिंघे यांच्या चर्चा केल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा विचार पुढे केला आहे. डेली मिररच्या रिपोर्टनुसार, क्रीडामंत्र्यांनी विरोधी पक्षनेते साजित प्रेमदासा यांच्याशीदेखील चर्चा केली आहे.
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकन संघ 9 पैकी फक्त 7 सामन्यात विजय मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. गुणतालिकेत नवव्या स्थानी असल्याने चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये अपात्र ठरला आहे. त्यामुळे एकेकाळी क्रिकेटमध्ये नावलौकिक असलेल्या श्रीलंकेची अशी अवस्था झाल्याने क्रीडाप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे.