विशाखापट्टणम | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात झाली आहे. इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स एंडरसन याने कडक सुरुवात करुन दिली आहे. दुसऱ्या दिवशी 143 धावांची मोठी आघाडी घेतल्या टीम इंडियाला जेम्स एंडरसने तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला झटपट 2 झटके दिले. एंडरसनने पहिल्या डावात डबल सेंच्युरी ठोकलेल्या यशस्वी जयस्वाल याला आऊट केलं. त्याआधी एंडरसनने कॅप्टन रोहित शर्मा याच्या दांड्या उडवल्या. त्यामुळे टीम इंडियाची स्थिती 2 बाद 30 अशी झाली.
टीम इंडियाने पहिल्या डावात 396 धावा केल्यानंतर इंग्लंडला 253 वर ऑलआऊट केलं. त्यामुळे टीम इंडियाला 143 रन्सची लीड मिळाली. त्यानंतर दुसऱ्या दिवसापर्यंत टीम इंडियाने 5 ओव्हरमध्ये बिनबाद 28 धावा केल्या. अशाप्रकारे टीम इंडियाकडे 171 धावांची आघाडी झाली. तिसऱ्या दिवशी कॅप्टन रोहित आणि यशस्वी ही जोडी मैदानात आली. मात्र अवघ्या 2 धावांच्या मोबदल्यात टीम इंडियाने 2 विके्टस गमावल्या.
जेम्सने तिसऱ्या दिवशी 7 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर रोहितला क्लिन बोल्ड केलं. रोहित 21 बॉलमध्ये 13 रन्स करुन माघारी परतला. त्यांतर यशस्वी नवव्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर कॅच आऊट झाला. यशस्वीने 17 धावा केल्या. विशेष म्हणजे एंडरसननेच पहिल्या डावातही यशस्वीला आऊट केलं होतं.
दरम्यान रोहित आणि यशस्वी सलामी जोडी झटपट आऊट झाल्याने आता टीम इंडिया अडचणीत सापडली आहे. त्यामुळे आता श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल या जोडीवर मोठी जबाबदारी असणार आहे. या दोघांना गेल्या काही सामन्यांपासून सातत्याने मोठी खेळी करण्यात अपयश आलं आहे. त्यामुळे दोघेही दबावात आहेत. अशात या दोघांची आता खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. या कसोटीत कोण आपल्या भूमिकेला न्याय देतं, याकडे क्रिकेट चाहत्यांची करडी नजर असणार आहे.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार.